Saturday, December 30, 2023
Sunday, March 5, 2023
जोहार
"हर्षा, कशी आहेस?" असे विचारले
तेव्हा ती हसून म्हणाली ,"तुमच्या आशिर्वादाने चांगलं सुरू आहे ब्वॉ.मायबापाने जिथं दिलं तिथं राहणं भाग आहे." मनभरून हसत ती म्हणाली.
तेवढ्यात मला एक फोन आला.एका कार्यक्रमासाठी मला जायचं होतं.तो कार्यक्रम माझ्या शिवाय सुरू होणार नव्हता.मी कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो.वेळेचे बंधन कडक होते. उशिरा जर कार्यक्रम सुरू झाला तर उशिरा बंद करावा, असे नव्हते. कधीही सुरु झाला तरी कार्यक्रम थांबविण्याची वेळ निश्चित होती. तो शासकीय नियमाचा भाग असल्याने पाळणे अत्यावश्यक होते.
हर्षासोबत आयाबायांचा घोळका आला होता.सर्वजणी आपापल्या परीने निटनेटके होऊन आल्या होत्या.माझ्या बाजूच्या घरात माझे शेजारी राहत होते.ते कोर्टाचे कर्मचारी असल्याने आणि आमचे वार्तालाप त्यांच्या संहितेत बसत नसल्याने आमच्याकडे त्यांचे लक्ष असण्याचे काही कारण नव्हते. ते त्यांच्या कामात गर्क असतात. माझ्या पुस्तकाच्या कपाटाकडे पाहत हर्षा म्हणाली,"या कपाटातला सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह मी वाचायला नेला होता." त्यावर मी काही बोलणार तोच फोन पुन्हा वाजला. मी हॅलो म्हणताच तिकडून आवाज आला. सर, प्लीज लवकर या." मी म्हणालो, "हो." मी घाई करू लागलो.महिला क्रिकेटचं उद्घाटन करायला जायचं होतं.
हर्षा सकाळी दक्षिणेकडे कापशीला एक तास घ्यायला जायची मग घरी अकोला येथे यायची. दुपारी पश्चिमेला पारसला आणखी एक तास घ्यायला जायची. मी तिला हे काही विचारलं नव्हतं पण असंच एकदा बोलता बोलता तिने सांगितले होते. जिथपर्यंत बस जाते तिथपर्यंत बसने जायचं. तिथे उतरून तिथे ठेवलेली गाडी घ्यायची. तिथून गाडीने जायचे. गाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ठेवलेली असे. तिथले कर्मचारी कोविडच्या महामारीतून वाचलेले होते. आता सटरफटर आजारांचे पेशंट यायला सुरुवात झाली होती. त्यांना उसंत नव्हती. ते आपल्या कामात मग्न असायचे.
मी पलंगावर जिथे बसलो होतो तिथल्या तिथे चुळबुळ करू लागलो.हर्षा खाली बसून चटई वरून बोटे फिरवू लागली.तिच्या हातात एकही बांगडी नव्हती.डाव्या हातात घड्याळ होते.साडी बऱ्यापैकी होती.गळ्यात सोन्याची चेन आणि बोटात अंगठी होती.
तिने एकदा कबड्डी खेळताना सगळ्या टीमला जास्तीत जास्त पॉईंट घेऊन जिंकून दिले होते. तेव्हा ही ती माझ्याकडे आली होती.तिचं अभिनंदन माझ्याकडून करवून घ्यायला.आम्हीही एक छोटेखानी कार्यक्रम करून तीचा सत्कार केला होता. "आता तू खेळणं सोडलं का?" असं मी तिला विचारताच ती म्हणाली,"मी आता कोच आहे."
तीने एका मध्यम वयीन महिलेच्या हातातील फळांची पिशवी घेऊन त्यातील फळे माझ्यासमोर टीपॉय वर असलेल्या बांबूच्या टोपलीत रचून ठेऊ लागली.तेव्हा तिच्या टिकली नसलेल्या गोऱ्या कपाळावर केसांची एक बट उगाच लोंबकळू लागली. फळे ठेवून झाल्यावर डाव्या हाताने तीने कपाटाखालचे जुने वर्तमान पत्र ओढून त्यात काहीतरी पाहू लागली. तिने यु ट्यूब वर बणवलेले काही व्हिडिओ मला दाखवले.त्यात तिने समोरचे कापलेले केस विशेषत्वाने दिसत होते. एकदा एका कार्यक्रमासाठी आम्ही सगळे ओक हाॅल मध्ये एकत्र आलो होतो.त्यावेळी तिने गझल गायली होती. माझ्या ती स्मरणात राहीली. मग दुसऱ्या वेळी एका हाॅस्पीटल मध्ये ती मला दिसली तेव्हा मी तिला स्वतःहून विचारलं की ,"तू इथे कशी? "तेव्हा तिने तिचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाल्याचे सांगितले. तेव्हापासून आमचा स्नेह कायम आहे.
हर्षाचा सावळा रंग आता सावळा न राहता तो निमगोरा होत आहे असे तिने एकदा मला सांगितले तेव्हा मी तिला विचारले होते की त्यासाठी तू कोणते क्रीम लावले. तेव्हा तिने मला अनेक क्रीम्स आणि तेलांची नावे सांगीतले. ज्याचा मला काहीही उपयोग नव्हता.तीच्या आत्याने तिची एक किडनी तीच्या काकांना देऊन त्यांचे प्राण वाचवले होते. त्याच तिच्या आत्याने तीला हा उपाय सांगीतला होता.
हर्षाचे एक आजोबा होते. त्यांना चार बायका होत्या. त्या आपापल्या लेकरांसोबत राहायच्या. रिटायर झाल्यावर ते एका बायको सोबत राहू लागले. तेव्हा एकीने खावटी वेळेवर मिळाली नाही म्हणून पोलीस पाठवले होते. तेव्हा पासून त्यांनी मुलीला बोलावून घेतले आणि त्यांची मुलगी तिथेच राहू लागली. आता कुणाचीही भांडणे होत नसत. हर्षा नळावर पाणी भरायला जाई तेव्हा आजोबा आपल्या नातीला कडेवर घेवून अंगणातल्या खाटेवर एक टांगी धोतर चापून चोपून नेसून बसलेले असत.हर्षाने तेव्हाच ठरवलं की आपण लग्न करायचं नाही. पण तिचा हा संकल्प तिला कालांतराने मोडावा लागला. तो मोडला म्हणून बरे झाले नाहीतर ती एका निष्णात बुद्धिबळ पटुची आई कशी काय झाली असती.
हर्षा आत गेली आणि चहाचे कप घेवून आली. उजव्या हातात ट्रे धरून डाव्या हाताने ती सर्वांना कप वाटू लागली.अंगणातल्या चाफ्याच्या झाडाला पांढरी शुभ्र फुले आली होती.
हर्षाची चुलत बहीण डॉक्टर आहे. ती सध्या अमेरिकेत राहते. तिने तिचे पहिले मिस्टर जे इंजिनियर होते त्यांना सोडचिठ्ठी दिली होती. करारा नुसार मुलगी सोबत घेवून तिने सध्याचे तिचे मिस्टर जे इंजिनियर तर आहेतच पण अमेरिकेत स्थायिक झाले आहेत आहेत त्यांच्याशी विवाह केला. पण अजूनही ती हर्षाला विसरली नाही.अधून मधून फोन करत राहते. ती अमेरिकेत असली तरी तिच्या संसारात खूष आहे ना बस आपल्याले दुसर काय पायजे असे तिचे बाबा कुणी विचारलं तर सांगत.मात्र ती लग्न झाल्यापासून कधीही भारतात आली की पहिल्यांदा सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी बोलवते.असे चहाचे कप नेता नेता तिने मला सांगितले.
मी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहू लागलो. त्याच्या बाजूलाच संविधानाची प्रत ठेवली होती.
सगळ्या आयाबाया संविधानाच्या प्रतीला नमस्कार करू लागल्या. आमचं घर पूर्णपणे जागृत झालं होतं.
🔅 संजय प्रल्हादराव डोंगरे°
९४२०७०४५८०
6_Mar_page final.pdf
बहुजन सौरभ ५ मार्च २३.pdf
जोहार
🌻जोहार

Wednesday, March 1, 2023
Saturday, February 25, 2023
धम्म परीषद आणि काही प्रश्न
धम्म परिषद कशासाठी? हा प्रश्न आपण अनेकदा ऐकत असतो.
गेल्या वीस वर्षांपासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रविवारी अकोला जिल्ह्यात भरतपूर, श्रावस्ती नगरी येथे असलेल्या तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळाच्या धम्म परिवेणात धम्म परिषद घेतल्या जातात. या धम्म परिषदेस पूज्य भदंत धम्मसेवकजी आणि पूज्य भदंत खेमधम्मोजी मुळावा यांच्या प्रेरणेचे अधिष्ठान आहे.
करुणा, प्रेम आणि बंधुभावाच्या निर्मितीसाठी अथक परिश्रम आणि अढळ निष्ठा आवश्यक आहे.हे तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ
भरतपूरकरांनी जाणले आहे.दूरदूर पर्यंत ज्ञानासाठी भटकावे लागते.ते भटकतात.ज्ञानवंत शोधतात. त्यांना निमंत्रित करतात. ... इथे विपश्यनाचार्य युगाचारा अमेरिका यांनी धम्म देसना दिली. दार्जिलिंगचे खासदार भदंत धम्मविरियो यांनी चारिका केली. बुद्धाच्या अस्थी श्रीलंकेेवरून भदंत विशुद्धानंद औरंगाबाद यांनी आणल्या.इथे कोणत्याही खर्चाशिवाय विवाह करून दिल्या जातो.उत्तम व्यवस्थापन आणि भोजन व्यवस्था आहे.
सन २००४ पासून ही धम्म परिषद घेतल्या जाते. या आधी ३० श्रामणेर ३० गावांमधून ३० दिवस पायी चारीका करणे हा उपक्रम तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ भरतपूर हे राबवित असायचे.गावं आणि मनं एकमेकांना जोडले जात असायचे. जुळवन घट्टसर होईपर्यंत परिश्रम आणि परिश्रम.
मी तिथे राहायला असतांना २०१२ मध्ये धम्मकविसंमेलन घेतले होते. धम्मपरिषदेत घेतले जाणारे कविसंमेलन म्हणून धम्मकविसंमेलन.अध्यक्ष अ.भा. डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे अध्यक्ष मान.अशोक बुरबुरे सर. त्यात चित्रकार बळी खैरे, सुप्रसिद्ध आंबेडकरीकवि कार्यकर्ते आनंद गायकवाड, डॉ.चंद्रकांत सरदार, कविवर्य शशिकांत टेंभुर्णे, गझलकार विनोद बुरबुरे यांच्यासह डॉ.अशोक इंगळे,कवि आतीष डोंगरे, चित्रपट निर्माते किशोर अवचार,कवि राजेश डोंगरे,इ. प्रख्यात कविंनी आपली उपस्थिती लावली होती.त्यावेळी मान्यवर कवि आनंदराव गोठाकडे यांनी स्मृतीचिन्हांचे दान करून मला मदत केली होती.जाणुजी इंगळे यांनी कविंच्या भोजनाची व्यवस्था केली होती.महाराष्ट्रातील हे पहिलीच धम्मकविसंमेलन आहे.याची नोंद घ्यावी लागेल.
मी जेव्हा तथागत सद्धम संदेश प्रचार मंडळ भरतपूरकरांच्या संपर्कात आलो.तो धम्मचर्चांचा कालखंड होता, तेव्हापासून. रात्री बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातला एक विषय निवडून त्यावर विविध आंगोपांगांनी चर्चा होई....ती पहाटेच्या आल्हाददायक सूर्यप्रकाशात मिसळून जाई पर्यन्त.
कृषिनगरचे खंडारे,राहीत साहितचे वाहूरवाघ,वणी रंभापूरचे देवानंद वानखडे , देवळीचे सदांशीव हे गंभीर चर्चा करायचे. प्रश्न उपस्थित करायचे.घुसरचे कालकथीत तु.हि.गोपनारायण यांच गाणं 'गेली माय दलिंद्री गेली व,माया भीमानं ठोकत नेली वं...' मी अशाच एका धम्मचर्चेत ऐकलं होतं. त्यांना मार्ग गोपनारायण असे म्हणत असत. मध्यम शेगावकर गुरुजींचे ते सहकारी होते. मध्यम शेगावकर गुरुजी हे दीनबंधू शेगावकर गुरुजींचे बंधु.मध्यम गुरुजी यांनी तथागत सद्धम्म संदेश प्रचार मंडळ स्थापन केले.त्यांच्या शाखा अकोला, अमरावती, वाशिम, जिल्ह्यात आहेत. भरतपूर येथे प्रारंभिक शाखा आहे.या गावातून अनेक भिक्षू झाले.आज अध्यक्ष भास्करराव खंडारे यांच्यासह नाजूकराव खंडारे,जयसेन खंडारे,शत्रृघ्न खंडारे, ड्रायव्हर इंगळे, सुनील अंभोरे,प्रा.दिपक इंगोले, माझोड येथील सेवानिवृत्त कंडक्टर गोविंदराव खंडारे, श्रद्धाळू उपासक एका भिक्षूनीचे पिता आयु.प्रल्हाद जंजाळ आजही त्याच ऊर्जेने कार्य करतात. माझोडचे पत्रकार साहेबराव खंडारे, ढोरे,घोगरे ,गवई,सुरडकर, बोराडे ,सोळंके, पवार ,गायकवाड आणि भरतपूर येथील समस्त गावकरी जन आपल्या परिसरातल्या सगळ्या बांधवांना सोबत घेऊन एकात्मतेचे हे शिबीर चालवीत आहेत. ह्या गावात करुणेचा,शीलाचा जो प्रज्ञामय मृद्गंध आहे तो तीथेच निर्माण होतो. माझ्या माहितीत कालकथित भंतेजी धम्ममित्र, कालकथित पी. आर. खंडारे, जानराव गवई, महादेवराव खंडारे, भगवान खंडारे मिस्त्री, श्रीहरी जंजाळ,कवि एम.बी.खंडारे, माझोड येथील कुमार भाऊ खंडारे इ.कार्यकर्ते होते. (सर्वच नावे सविस्तरपणे लिहिताना देता येतील)
सध्या जे भिक्षू कार्यरत आहेत त्यात आर्याजी धम्ममेघा उ. प्र., पु. भंते श्रद्धानंद भरतपूर, भंते बी. बोधिशील औरंगाबाद, पू.भंते रठ्ठपाल,पु.भंते धम्मसागर खडकी अशा प्रकारे विविध ठिकाणी कार्यरत आहेत. आत्ताशा चैत्यभूमीचे व्यवस्थापक पूज्य भंते बी. संघपालजी बुद्धभूमि शिर्ला आणि महान मैत्रीवान पु.भदन्त ज्ञानज्योतीजी,ताडोबा चंद्रपूर यांच्या प्रवचनानेच समारोप होतो.ज्ञानाच्या प्रकाशाची आभा दिवसेंदिवस गडद होत आहे.
या निमित्ताने जो प्रश्न निर्माण झाला तो चर्चेला घ्यायचा आहे.नाहीतर तो निसटून जाईल. त्यातून अनेक प्रश्नांची निर्मिती होते.ते म्हणजे...
स्वातंत्र्य म्हणजे काय?
मुक्तत्व म्हणजे काय?
हे मुख्य प्रश्न आज प्रामुख्याने उभे राहिले. प्रश्न निर्माण झाले की ; त्याची उत्तरे शोधणे आलेच. ते शोधता शोधता हे लक्षात आले की हे प्रश्न निर्माण होण्यामागे काही कारण आहे की मग त्यावर उत्तर हे आहेच हे आपल्याला दिसू लागते. हे तत्वच आहे प्रश्न मुक्तीच. आता,निर्माण करण्यात आलेल्या
या प्रश्नांमधून आपल्यासमोर जो उत्तरांचा सहसंबंध उभा राहतो , त्यातून एक निरामय विश्व निर्माण व्हावे. ही परिणती अपेक्षित असावी...या निरामय विश्वाचे काळाशी आणि स्थळाशी जे अमर्यादपण सांधले गेलेले आहे, त्याचाही विचार आपल्यासमोर येतोच येतो.
धम्मसंगितीं पासून तर धम्मपरिषदांमुळे स्थूल मानाने जे काय झालेले आहे, ते इतिहासातून चालत चालत आलेले आजच्या आपल्या काळापर्यंत आज रोजी आपल्याला दिसते आहे.आपण ते पाहत आलेले आहोत. किंबहुना हा जो काही शांततापूर्ण जीवनाचा ढाच्या आपल्यासमोर दिसतो आहे, त्याची जी काही अनेकविध प्रारूपे आपल्याला दृश्यमान झालेली अनुभवता येत आहेत त्यातूनच आजचे प्रासंगिक रचनाकार दृग्गोचर होत आहेत.हे सत्य आहे.आणि हेही सत्य आहे की ...तरीही त्या सर्वांचा जो आंतरिक भाव आहे तो त्या ,ज्यातून त्याचं येण यापूर्वीच आपण ठसठशीत केलं आहे तेही हेच आहे. तेच आहे स्वातंत्र्य....
मग हा युगसापेक्ष प्रश्न निर्माण होत आहे की मुक्तत्व आणि स्वातंत्र्य यामध्ये काही भिन्नत्व आहे का?स्वातंत्र्य हे स्वतःहून प्राप्त करता येतं का? की स्वातंत्र्य कुणाकडून घ्यावं लागतं? की स्वातंत्र्य कोणीतरी द्यावं लागतं ! की स्वातंत्र्य हे कुणीतरी देण्याची आणि कुणीतरी घेण्याची जी काही असेल ती प्रक्रिया आहे! स्वातंत्र्य हे वैयक्तिक असतं का? की ते समष्टी दर्शक आहे? स्वातंत्र्य हे किती कालावधीपर्यंत आपण घेऊ शकू? स्वातंत्र्याच्या काय मर्यादा असतात का? स्वातंत्र्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मुक्तत्वाला लागू पडतात का? की ते फक्त 'काय आहे ते' या अभिव्यक्तीस जीवंत ठेवणारे आहे? कुठून निर्माण होतो हा प्रश्न? मुक्तत्वाचा आणि समष्टीचा काही संबंध आहे का? समष्टीमध्ये मुक्तत्वाचा वावर होतो का? समष्टीमध्ये मुक्तत्व जन्म घेऊ शकत का? स्वातंत्र्यामध्ये मुक्तता असते का? मुक्ततेमध्ये स्वातंत्र्य असू शकते का? स्वातंत्र्य व्यापक आहे की मुक्तत्व व्यापक आहे? यापैकी जे व्यापक आहे असे आपण ठरवतो ते आपल्याला हवं आहे की जे व्यापकत्वाला कुंपण घालणाऱ्यांना अडवत नाही ते आपल्याला हवं आहे? हे ठरवणार् कोण? आपण आपल्याला जे काय हव आहे ते प्राप्त करण्याचा अधिकार आपणच आपल्याला देतो हा निसर्ग नियम बाजूला सारून जर आपल्याला जे हवे आहेत ते जर आपण पुन्हा अन्याकडून घेण्याची अपेक्षा करतो तर ते देणारा जो कोणी आहे, जी कोणती यंत्रणा आहे त्यांनी त्यांच्या कोट्यातून ते आपल्याला देऊ केले तर ..! आणि आपण ते स्वीकारले तर ! किंवा स्वीकारायचे किंवा नाही स्वीकारायचे हा आपला स्वतःचा अधिकार आपण राखून ठेवायचा आहे की नाही , यावर आपण चर्चासत्रांचे आयोजन करू लागलो आहोत,असे सत्य दिसत असेल तर ! तर ,याला काय म्हणावे? असे खडसावल्यासारखे अनेकविध प्रश्न जेव्हा निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे सापडणे कठीण होते तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण कुठे जावे, असा प्रश्न ज्यांनी आपल्याला जे कोणते प्रश्न निर्माण होतील तेव्हा त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपण स्वतःच एक अत्यंत पूजनीय स्थान निर्माण करावे असे अध्यापन केलेले आहे ते आपल्याला समोरच दिसत आहेत,हे विसरता कामा नये.जे हे शिकले त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी तिथे जाता येते.तिथे जाता येण्यासाठी हवा असतो एक मार्ग. तो मार्ग त्या पूजनीय ठिकाणाहून शिकवण्यात आलेला आहेच. त्याच मार्गाने तिथपर्यंत जाता येते....आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेता येते.
त्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि एकमेव असा मार्ग आहे धम्मपरिषद.जिथे संगायन होते.त्याला संगिती असे देखील म्हणता येणार. संगिती मध्ये विचारांचे संगायन होते.ते गाथांचे संगायन आहे की सूत्रांचे संगायन.की विनयांचे संगायन! असा प्रश्न अशावेळी निर्माण होत नाही.....
संगिती मध्ये जेव्हा अनेकवीध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सगळे अर्हत एकत्र आलेले असतात तेव्हा त्यांच्यासमोर मुक्तते संबंधात कोणताही प्रश्न शिल्लक उरलेला नसतो, हे त्यांनाही माहित असते.त्यांना शिल्लक प्रश्न उरलेला नाही हे माहिती आहे. संगायन करणे ही वर्तमानीय वस्तूस्थितीला अनुसरून लोकाचारांचं अध्ययन करता येण्यासाठीची अत्यावश्यक घटना आहे हे ही माहित असते. या प्रसंगाला त्यांनीच निर्माण केलेले आहे. या घटनेच्या माध्यमातून त्यांनी ज्या अत्यावश्यक असणाऱ्या बाबी आज रोजी हव्या आहेत त्या परिपूर्ण करता येतात.हे प्राप्त वस्तूस्थितीला अनुलक्षून असणाऱ्या समाजाला सांगणे, पटवणे, रुजवणे, बाणवणे त्यांचे कर्तव्य पूर्ण केले पाहिजे.हा प्रसंगाला ते प्राणापलीकडेही जपून त्याच्याच माध्यमातून त्या अत्यावश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करतात. त्याचे प्रशिक्षणीय पैलू या माध्यमातून..समाजाला सांगता यावे.. याबाबतीतला वैज्ञानिक परामर्ष त्या ठिकाणी करतात.अशा प्रकारचं प्रशिक्षणच निर्माण करतात.संगितीत जेव्हा हे संगायन होते आणि त्याबाबतीत चर्चा होतात, विमर्ष होतात.. ते अनेक अंगाने होतात. त्या चर्चांचं सांगायन सुद्धा होणं आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या समाजाला अत्यंत आवश्यक आहे. तूर्त आपण एवढा जरी विचार करू शकलो की या संगायनाच्या दरम्यान अथवा जेव्हा हे संगायान होत नसतं अशावेळी हे अर्हत लोक आपापल्या ठिकाणी निघून जातात की आणखी काय करतात. तर अशावेळी ते जे काय करत असतात ते, समाजाच प्रतिबिंब असते असं म्हणण्या ऐवजी समाजामध्ये अशाच प्रकारची आचार प्रणाली रहावी हे स्वतःहून न सांगता आपल्या वर्तनातून ते दाखवून देत असतात. कोणी अशाप्रकारे वागतोय की नाही वागत याकडे त्यांचं लक्ष, जाणिव असते. त्यांचं लक्ष असं असतं की जो आदर्श आचार प्रणालीचा आयाम आहे त्याचा जन्मदाता अर्हत असल्यामुळे त्या अर्हतांमधूनच अशा प्रकारचा समाज जर निर्माण झाला तर तो समाज शिस्तप्रिय आणि मैत्रीकरुणाआनंदत्रयस्थ भाव एकत्रितपणे जाणणारा आणि त्याचा अनुभव करणारा असेल....हे संगितीच फलित आहे.ते बहूविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते..अशा ठराविक समूहाने पृथ्वीला तरुण ठेवले आहे.
अशा प्रकारे आजच्या आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला संगितींमधून येणारी अशा प्रकारची सूत्रे मांडता येतात. अशा प्रकारच्या सूत्रांमधूनच आपल्याला आदर्श समाजाची रचना करता येईल. आदर्श समाज रचनेचे आयाम मांडता येतील.ज्या प्रसंगाचा आधार घेऊन हा कार्यक्रम पृथ्वीभर राबवल्या जातो आहे ,त्याच प्रसंगातून अशा प्रकारच्या रचनेची जर निर्मिती झाली तर त्या समाजामध्ये जातीभेदाचे उच्चाटन होईल.
जेव्हा जातीभेदाचे उच्चाटन होते तेव्हा आदर्श समाजाची निर्मिती झालेली आहे असे समजले जाते. हीच आदर्श समाजाची आऊटलाईन आहे.
दिशांना पंख झटकून स्वतःच्या पलीकडे विस्तारीत नवा जन्म घेऊ पाहणाऱ्या अमर्याद विश्वाचा वेध घेता येऊ देतात हे तत्व.या तत्वांचा प्रसव या प्रसंगातून होतो हे माहिती असते.अविद्येतून जागे होण्याचे प्रसंग जन्माला येऊ लागतात.
🔅संजय प्रल्हादराव डोंगरे, अकोला
▫️९४२०७०४५८०
Sunday, February 19, 2023
शांतता (महाकोठ्ठीत)
(महाकोठ्ठीत)
हे काही अचानक घडले नाही आहे. काय झालं ते काय कळत आहे का ? काहीही न करता हे मात्र शक्य नाही.... नेमकं काय केलं हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही.अशी ही अवस्था.ही इथे या ठिकाणी निर्माण झालेली प्रचंडावस्था आहे.ज्याच्यामध्ये ही स्फुरलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारची विश्वं विविध प्रकारच्या पातळीवर वावरताना दिसतात.
हे मी माझ्या बद्दलच बोलतोय असे नाही. पण स्वप्न असते प्रत्येकाचे वर जाण्याचे! स्वप्न म्हणजे ईच्छा असते.अपेक्षा असते.महत्वाकांक्षा असते.वर गेले पाहिजे.वर जाता आले पाहिजे.वर जाता येऊ शकते का? वर जाता येणे शक्य आहे का?....... ते शक्य असल्याशिवाय का इतकी प्रारुपे दृश्यमान स्वरूपात दिसतात! ही प्रारूपे आहेत तरी कशाची?.. ही प्रारूपे आहेत मार्गांची.
वर जाणे शक्य आहे..... जिथून वर जायचे आहे. तिथे आपण किती काळ होतो.याचे ज्ञान असणे किंवा ते ज्ञान नसणे याचा वर जाण्याच्या या प्रयत्नांना काहीही मागमूस असावा हे काही अत्यावश्यक नाही.मन शांत झालं की वर जाता येते.हे मनाच्या शांततेचं शांत होणं सरेआम जसं आपल्याला वाटतं तसं साधंसुधं नाही.ते उपशांत होणे आहे. उपशांत होणे हे गंभीरपणा सशक्त होऊन सर्वतोपरीने साधा - सरळ आणि सर्वतोमुखी होतो तेव्हा ते अस्सल अर्थ धारण करणे असे होते. हे चांगल्याप्रकारे लक्षात घेतले पाहिजे.
आता , तो वर जातो. त्याचे हे वर जाणे त्याने आधीच ठरवलेले होते.त्याला नेमके कुठे जायचे आहे हे निश्चित चित्र काढता येत नसते.ते चित्र अस्तित्वातच नसते.जेव्हा तो वर जातो तेव्हा तिथे गेल्यावर त्याला ती भूमी दिसते.तो ती भूमी जाणतो तेव्हा ही भूमी मला आधीपासूनच ठाऊक होती असे त्याच्या लक्षात येते आणि त्याच्या आनंदाचा विस्तार होत जातो.त्या भूमीत आल्यानंतर त्याचं बोलणं निश्चित शहाणपणाचं होतं.त्याचं ते भाषणच होतं. त्याला मन्तभाणी असे म्हटले आहे.त्याचं ते जे भाषण होतं ते इतकं शहाणपणाचं , इतकं प्रज्ञामय आणि लोभस की ते पाहाणाऱ्या ऐकणाऱ्याला ऐकत-पाहात रहावस वाटावं.असं असतं ते.
त्यात उध्दटपणाच्या अक्षराचा गंधही नसतो.
त्यांचं भाषण आता अनुद्धट झालं आहे.
पण तो माणूसच आहे.माणूस आहे म्हणून अनेक प्रसंग येतात.जेव्हा माणुसकीला लांछन लावणाऱ्या काही कृती पाहण्याचे प्रसंग जर येत असतील तर त्या प्रसंगांना सामोरे जाता येते.तिथे जाऊन आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार जर आला असेलच तर त्याला तो धुनकतो.गादीवर काठ्या मारून मारून त्या गादीतला रू एक प्रकारे झटकून काढतो.रू कापूस असताना कापूस पिंजून काढतो. त्यातला रु आणि सरकी वेगवेगळी करतो असे करणाऱ्या त्या पिंजाऱ्यासारखा हा माणूस.तो विकारी आचरण खल्लास करतो आणि अस्सल वर्तन जे नितळ मनाने कार्यान्वित झाले आहे ते कायम ठेवतो.
ते असेही सांगता येईल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाच्या वाळलेल्या पानाला हवेची एखादी झुळूक जरी आली तरी ती झर्रकन उडवून नेते. त्याप्रमाणे तो विकाराला उडवून लावतो.हे तो कसे करतो ? तो करतो.ते आता त्याच्या हातातच असते.आता त्याला दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज भासत नाही.स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या कोणत्याही प्रकारच्या विचाराला तो स्वतः ठरवू शकतो.विचार कशाबद्दल आहे? रागाचा आहे. मोहाचा आहे. द्वेषाचा आहे. की प्रेमाचा आहे. बांधिलकीचा आहे.बंधुभावाचा आहे.एवढंच नाही, तो त्यावर प्रक्रिया करू शकतो. रागाचा असेल तर तो त्याला चिमटीत पकडून ठेवतो. मोहाचा ,द्वेषाचा असेल तर त्या वाळलेल्या पानासारखा भिरकावून देतो त्याला.जर प्रेमाचा असेल.बांधिलकीचा असेल.बंधुभावाचा असेल.तर त्याची तो जोपासना करतो.वाढ करतो.या परिवर्तनाच्या पातळ्या अत्यंत तरलतेने त्याच्या बोलण्यात येतात.त्याच्या मन्तभाषणात येतात. त्याच्या गंभीरपणाने त्याची जी शांतता झालेली दिसते आहे, ती शांतता जो गंभीरपणा धारण करते आहे तो हा गंभीरपणा काही साधासुधा नसतो.तो जो अत्यंत प्रयत्न करत आहे त्यातून त्याला प्राप्त झालेला हा स्वभाव आहे .
तो आता हे जाणतो की मी आता वर आलेला आहे.मी आता अशा भूमीत आलेला आहे की ज्या भूमीतून मी कोणत्याही विकाराकडे पाहू शकतो. विचारांकडे पाहू शकतो.त्या विचारांना विकार असेल तर विकार.विचार असेल तर विचार जे काय असेल असे त्यांना ओळखू शकतो.आणि जर मी हे ओळखू शकत असेल, त्यांना नाव देऊ शकत असेल तर नाम आणि त्याचं रूप एकच आहे मी जाणणारा असल्यामुळे मला त्याच्यावर प्रक्रिया करता येते.जर मला या विचारांवरच प्रक्रिया करता येत असेल तर मला त्या विचारांमध्ये अडकून पडण्याची काय आवश्यकता ऊरत नाही. त्या विचारांमध्ये लिप्त होणं अशक्य ठरतं.ते विचार म्हणजे मी असा होत नाही तर माझ्यामध्ये ते उत्पन्न झालेले विचार आहे आणि ते विचार मी वाढवू शकतो किंवा मी ते विचार काढून टाकू शकतो म्हणून माझ्यामध्ये मी अशा प्रकारची एक अवस्था निर्माण झालेली स्वतःच पाहू शकतो. माझ्यामध्ये निर्माण झालेले हे विचार जर मी स्वतः पाहू शकत असेल तर मी इतरांच्या विचारांकडे सुद्धा पाहू शकतो.माझ्या विचारांमध्ये जर मी पाहू शकतो तर माझ्या मनामध्ये काहीही कोणत्याही प्रकारचं विचार म्हणून उरलेलं नाही.ते शून्य झालेलं आहे. मी एकही माझ्या सानिध्यात येत असतील तर त्यांना त्यांच्या विचारांसह पाहू शकतो.त्यांच्या विचारासह जर मला पाहता येत असेल तर त्यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न करणं हे मला सहज शक्य आहे. त्यांना माणुसकी प्रणित जीवन काय आहे हे सांगता येईल. सहज शक्य आहे ते.विचारातूनच माणूस बनतो. हे सगळ्या प्रयत्नांतून बघणे शक्य झालेले आहे. त्या माणसांमध्ये कोणता विचार उत्पन्न करावा हे मी माझ्या हातात ठेवले आहे.मी त्याच्या मध्ये कोणताही विचार उत्पन्न होऊ देऊ शकतो.मी शांत झालो.मी, वर्ग, माझी भाषा, बदल्यांच वर्तुळ पूर्ण झालेलं आहे.
• संजय प्रल्हादराव डोंगरे. 9420704580
एका विषयाची गोष्ट
Sunday, February 12, 2023
ऑक्सीजन
ऑक्सिजन
🌻ऑक्सीजन
ऑक्सिजन
गाडी आली नि ऑक्सिजनचे सिलेंडर टाकले. ते घ्यायलाही कुणीच नव्हतं. मग रस्त्यावरचे भिकारी पुढे सरसावले त्यांनी एकेक सिलेंडर डोक्यावर घेऊन गोदामात पोचवले. .... त्या दिवशी त्यांना गोदामातर्फे जेवण देण्यात आलं.
•
चर्चक
दोन मित्र आहेत.एकाच्या पायात लाल जोडा. एकाच्या पांढरा.पुलाजवळ पोचले. तिथे पाटी लिहिलेली आहे.एकावेळी एकच जाऊ शकेल. त्याच पाटीजवळ त्यांची चर्चा सुरु आहे . कोणी कुणाच्या खांद्यावर बसावं...
सायकल आणि घोडा ज्यांचे कडे आहे असे अनेक जण त्यांची चर्चा ऐकत त्यांच्याकडे पाहत आहेत..
•
स्वँब
दोन तास उभं राहून स्वँब देला.तो निगेटिव्ह आला. त्याचा आनंद गगनात मावेना. तो विचार करू लागला की असं कसं झालं. नक्कीच स्वँब घेणारा माणूस आपला असला पाहिजे....
•
प्रवाह
"प्रवाहाला नसतं कुठलंही वळण तो असतो अगदी सरळ जरा वरून पाहायचं असतं. माणसेच क्षणाक्षणाला वाकत असतात नि रस्ता वळला म्हणतात." रस्ता वळलेला नसतो असे आपल्या भाषणात जोरजोरात प्रतिपादन करून झाल्यावर साहेब समोरच्या पेल्यातले पाणी घटघट प्याले आणि खाली न बसता उभ्याउभ्याच स्टेजवरून खाली उतरले.
एका श्रोत्याच्या खिशातला एक रुपया छनकन खाली पडला तेव्हा तो घ्यायला तो वाकला. ... आणि सारी पब्लिक खदाखदा हसू लागली. वाकलेला माणूस कसा असतो हे त्यांना प्रात्यक्षिक दिसले होते.
•
कुठं?
“अन्न, वस्त्र,निवारा नको आम्हाला, काहीही नको..”, असे काकुळतीला येऊन तो कुटुंब प्रमुख बोलला. “मग तुम्ही चालले कुठं सगळेच्या सगळे?” त्याने हातातली काठी ऊभी धरून ,दोन्ही हात जोडून त्या पोलिसांना नमस्कार केला. मागच्या सर्वांनीही त्याचे
अनुकरण केले.
आपण कुठं चाललो हे कुणालाच सांगता येत नव्हते.
•
आयडिया
जुने प्लास्टिकचे मग, स्क्रू, खिळे, प्लॅस्टिक पाईप, लाकडी काठी, वह्या, डायऱ्या, पेन, चुना, वॅक्स, रंग, स्टूल, पाळणे, दोरी, कपडे, टॉवेल ,रुमाल, सुई, दोरा, तार, वायर, बांगड्या, फोन, टी.व्ही., कॉम्प्युटर, घड्याळ,प्लेट,बॉल,पाणी,भाजीपाला,मच्छरदाणी…हे सगळं पुरेसं आहे घरात राहायला.
पैसा … ब्यांकेत कसा जमा होईल! हाच फक्त विचार आहे.
•
बोगदा
या टोकापासून तर त्या टोका पर्यंत एकही दुकान उघडं नाही.या रणरणत्या दुपारच्या उन्हात अंधाऱ्या बोगद्यात पडल्यासारखा तो उभा होता.त्याला पाहून कुत्रंही केकाटल नाही.जिकडे पाहावे तिकडे कुलपंच कुलुपं दिसत होते."परत जावं नि नंतर यावं" असा
विचार त्याच्या डोक्यात आला.
पण, तो इतक्या दूर आला होता की. मागे फिरण्यात काहीही अर्थ नव्हता.
•
ड्युटी
कोविशील्डचा डोझ शिरींज मध्ये भरून झाल्यावर तिचं लक्ष दरवाज्याकडे गेलं.तिथे तो दिसला.तिने नाकातले पाणी ओढत खुर्चीवर बसलेल्या लाभार्थ्याच्या दंडाला डाव्या हाताने ओढले, इंजेक्शन टोचले आणि काढून डस्टबिन मध्ये टाकून आपल्या तळहातावर – या हाताने त्या हातावर बोळा फिरवीत म्हणाली,"कशाला आला या जीवघेण्या गर्दीत.आलीच असती मी." त्याने खाली पाहून दोन्ही खांदे उडवले आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला.
•
० 🔅 संजय प्रल्हादराव डोंगरे
-
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5350665004556892033?BookName=Dhammasangiti