आंबेडकरी शास्त्र /समिक्षा


धम्मशिक्षक


धम्मशिक्षकम्हणजे शिक्षकाचा व्यवसाय करणारे.
अंगणवाडी पासून शाळेची ओळख होते. शिक्षकाचा व्यवसाय हा फारच जबाबदारीचा
व्यवसाय आहे. पिढीची घडवणूक शिक्षकच करतात.
शिक्षक हा धम्माचरण करणारा असावा. विद्यार्थ्यांसमोर जातांना
शिक्षकामध्ये आत्मविश्वास असावा लागतो. एकदा जरी विद्यार्थ्यांसमोर
आत्मविश्वासाचा लोप झाल्यासारखे झाले , तर शिक्षकास पुढे विद्यार्थ्यास
काहीही सांगणे दुष्प्राप्य होऊन जाते. शिक्षकाला शिक्षकी पेशात स्वताचे
स्वत्व अबाधित राखता आले पाहिजे. धम्माचरणाने हे शक्य होते.
अनेक लोक , शिक्षक धम्माप्रमाणे आचरण करीत असतात. त्यांना माहितीही नसते.
की आपण धम्मचारी आहोत. पण त्यांना त्याचं फळ मिळत असतेच. ह्या बाबतीतली
जर माहिती असली तर फळप्राप्तीत ओज येते. शिक्षक हा आपले कार्य फलप्राप्ती
साठी करीत नाही ,तोच शिक्षक. तो आपले कार्य कारीतच असतो.पण आपण जे काही
करतो आहोत ते ध्यान पूर्वक करणारा आणि ज्याला ह्याची जाणीव आहे की मी जे
काही करेन त्याचे फळ मला मिळेलच मिळेल.चांगले कृत्य केले तर चांगले फळ
मिळेल .वाईट कार्य केले तर वाईट फळ मिळेल म्हणजे जो जागेपानाने कार्य
करतो. कार्य करताना जो सतत जागृत राहून करतो. तेच खरे कार्य. ते कार्य
करतांना त्यामध्ये कार्य करणाराचे खरे श्रम दडलेले असतात.
'
चेहरे ओरबाडलेल्या देशात' हा दीपक ढोले यांचा नुकताच प्रकाशित झालेला
काव्य संग्रह . कवी म्हणतो,
मित्रा
,आपण बंदुकीवर
करायलाच
हवे प्रेम तेही खरेखुरे .
जोवर
लागणार नाहीत माळरानाला
माणुसकीचे
झरे!
"
काटे वेचणारान होऊ नये काटा.
इतरांसाठी
कराव्यात स्वच्छ सुंदर वाटा
"
फेकून द्यावी बुरसटलेली जुनी पुरानी कात
पाखरांनी
पुसू नये पाखरांची जात.
राख
झाली वर्ण रुढींची कालच्या वणव्यात
जुन
सार विसरून करू उद्याची बात
चोचीतून
एकमेका चोचीतून भरवू
आपुलकी
प्रेमभाव नसानसात मुरवू .
जीवनात
या साथ देऊ सुख दुक्खात
पाखरान
पुसू नये पाखराची जात.'
धम्म शिक्षक असे असतात. याचं साद्यंत वर्णन करावं. असे वाटावे. इतकी
होमोजीनियस झाली आहे ही कविता . ही तादात्म्यता कवीचे बलस्थान असते. हे
तदृपण कवितेत साकार होन्यासाठी कवीच जगण मातीशी एकरूप झालेलं असलं
पाहिजे. ह्या जगण्याची दमछाक कागदावर उमटवण्याच बळ लेखणीत उतरवता आलं
पाहिजे. दीपक ढोले हे शिक्षक नाहीत. ते कारगिल युद्धातले सैनिक. भारत -
पाकिस्तान सीमेवर प्रत्यक्ष लढलेले. कैकदा मृत्यू त्यांना स्पर्शून
गेलेला. मृत्यूची विविध रूपं ज्यांनी डोळ्यात पिंजून ठेवलेली आहेत असा हा
माणूस.आर्तेने म्हणतो -
मी
यावेळी दुर्गम टायगर हिल चढत आहे.
तू
तिकडे अशीच संसाराचा उंच पहाड
एकाकीपणे
चढत असशील
खरे
आहे...दम छाक होते तरीही ते अटळच "
दुसरा
काही उपायाच नसतो . जे जगणे एकदा स्वीकारले ते शेवटावर न्यावेच लागते.
शिक्षक जर झालात तर शिक्षकासारखे वागावेच लागते. ते अटळ आहे. डी.एड.कॉलेज
अकोला येथे बी.टी.चव्हाण नावाचे एक प्राध्यापक होते.ते आता सेवानिवृत्त
झाले आहेत. त्यांच एक फार मोठ वैशिष्ट्य . विद्यार्थी आणि सहकाऱ्यांच्या
मनोविश्वाचा वेध घेण्याची त्यांना आर्त तहान. पुस्तकातून पाहून शिकवणारे
अनेक शिक्षक असतात. किंवा काही पाठ काढून शिकविणारेही. त्यांचं मोठेपण
अबाधित राखून. जे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनोविश्वाचा वेध घेतात
त्यांना धम्म शिक्षक म्हणावे.दीपक ढोलेची कविता ही धम्म शिक्षकाची भूमिका
पार पडणारी कविता आहे.
एवढे या प्रसंगी सांगण्यात आले आहे.
******************************

"धम्मसंगीती " हे संजय प्रल्हादराव डोंगरे यांचे धम्ममंथन घडवून आणणारे मौलिक पुस्तक आहे. " विचारांचे आदानप्रदान आणि त्यातून समृध्द मानवी मनाच्या सुंदर निर्मितीसाठी धम्मसंगीती होत्या " असं प्रतिपादन स्वत: लेखकाने केले आहे.
दु:खाबरोबरच इतर कोणत्याही वस्तूचे सम्यक ज्ञान प्राप्त व्हावे व ते आपल्या आचरणात परिवर्तीत व्हावे म्हणून परिव्रजेपासून तर समाधीतून सम्यक संबुद्धापर्यंत तथागताचा प्रवास आपणा सर्वांना ज्ञात आहे. " चालू जीवनातील दु:ख नष्ट व्हावे आणि भावी जीवनात दु:ख निर्माण होऊ नये अर्थात परमश्रेष्ठ निर्वाणपद प्राप्त व्हावे ". यासाठी परिव्रजा स्वीकारतात असे उत्तर भन्ते नागसेन यांनी राजा मिलिंदला दिल्याचे आपण "मिलिंद प्रश्न " मधून जाणतो. कालौघात बुद्ध धम्मात शिरलेली विसंगती खोडणे आणि बुद्धाच्या मूळ तत्त्वज्ञानाची सुसंगत मांडणी करणे यासाठी धम्मसंगीती अर्थात बौद्धसंगीती गरजेची होती असे आपणांस वाटते.
प्रल्हाद डोंगरे यांच्या "धम्मसंगीती" ची प्रस्तावना लिहितांना डॉ गंगाधर पानतावणे म्हणतात, " बौद्ध तत्त्वज्ञानाचे वहन करणा-या श्रावकांच्या विचारधारा जेव्हा विकीर्ण होऊ लागल्या तेव्हा भगवान तथागताला अभिप्रेत असलेल्या संज्ञा, संवाद, तात्त्विकता आणि निष्पती यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला. प्रज्ञावान
महस्थविरांच्या, मग ते कोणत्याही काळातील असोत, त्यांना पुन:धम्मसंवाद अपरिहार्य वाटला, आणि धम्मसंगीती अस्तित्वात आली. धम्मतत्त्वज्ञानाला विविध कारणानी येऊ पाहणारी ग्लानी परतवून लावण्यासाठी जे धम्ममंथन झाले, याचा साद्यंत इतिहास म्हणजे "धम्मसंगीती. "
प्रल्हाद डोंगरे हे मूळात कथापिंडाचे लेखक असल्याने " धम्मसंगीती " चं लेखन कथात्मक झालं आहे. त्यामूळे त्यांच्या लेखनात ओघवती संवादशैली आणि प्रवाही निवेदन आले आहे. म्हणून हे पुस्तक वाचायला घेतले की संपेपर्यंत हातून सुटत नाही. प्रल्हाद डोंगरे यांचे हे लेखनकौशल्य वाखनण्याजोगे आहे. एकूण आठ नऊ प्रकरणात लिहिलेलं हे पुस्तक चारही धम्मसंगीतींची मूलभूत चर्चा आणि चिंतन मांडणारं आहे. पहिल्याच प्रकरणात धम्मसंगीतीची व्याख्या करताना लेखक म्हणतो, " पात्र व्यक्ती योग्य ठिकाणी येऊन लोकशाही पध्दतीने बुद्धवचनांचं संगायन ज्या परिषदेमध्ये करतात त्या परिषदेस धम्मसंगीती असे म्हणतात. " अशी व्याख्या सांगून त्यात येणा-या शब्दाचे अर्थपूर्ण विश्लेषण केले आहे.
पहिली धम्मसंगीती महाकाश्यपजींच्या करवी इ स पुर्व 483 राजगृह मगध येथे भरली. दुसरी धम्मसंगीती भन्ते यशच्या प्रयत्नाने इ स पुर्व 383 मध्येे वालीकराम मगध येथे भरली. तिसरी धम्मसंगीती सम्राट अशोकाच्या काळात मोगलीपुत्त तिस्स करवी पाटलीपुत्र येथे इ स पुर्व 243 मध्येे भरली. चौथी धम्मसंगीती इ स पुर्व 100 मध्येे कुंदनवन (काश्मीर) येथे कनिष्काच्या कार्यकाळात अश्वघोष करवी भरली.
तथागताच्या महापरिनिर्वाणाची पार्श्वभूमी संजय डोंगरेंनी इतक्या संवेदनशील शब्दात लिहिली की वाचक गलबलून जातो. तथागताला चुन्दाने दिलेलं "सुकरमार्दव " चं भोजन, तथागताला झालेला रक्तस्राव, महापरिनिर्वाण हे वर्णन इतकं हळवं आहे की एकाग्र चित्तानं समजून घेण्यासारखं आहे. पुढच्या प्रकरणातील बिंबिसार, आजातशत्रु यांची माहिती वाचनीय आहे. तथागताचे महापरिनिर्वाण होऊन शंभर वर्षांनी वज्जीपुत्तक भिक्षूंच्या विसंगत आचरणाला पायबंद घालण्यासाठी दुसरी धम्मसंगीती भरली. सम्राट अशोकाला करावयाचे परिमार्जनाचं कारण तिसरी धम्मसंगीतीच्या मूळाशी होत असं नमूद करून लेखकाने अशोकाच्या दानशूरतेची, धम्मप्रचाराची दिलेली माहिती ऐतिहासिक आहे. "महाविभाषा " ग्रंथाची निर्मिती हे चौथ्या धम्मसंगीतीचे प्रयोजन होते असे सांगून
अश्वघोष च्या प्रयत्नाने कनिष्क राजाने ती भरवली असे लेखक आठव्या प्रकरणात नमूद करतात. अश्वघोष आणि प्रभा याचं प्रेम, अश्वघोषानी तिच्या वियोगात लिहिलेलं नाटक "उर्वशी वियोग " हे भारतीय पहिलं नाटक आणि अश्वघोष हा अद्य नाटककार हे लेखकाने मांडलेले मुद्दे मूळातून समजून घेण्यासारखे आहेत. शेवटच्या प्रकरणात
" धम्मसंगीतीची आवश्यकता ही धम्म हजारो वर्षे टाकण्यासाठी गरजेची आहे. सुत्रांचं, विनयांचं, धम्माचं पठन केल्याने
धम्मगाथांची उजळणी होते. ते चिरकाल टाकण्यासाठी परिस्थिती निश्चितच निर्माण होते. " (पान नं 127) असे धम्मसंगीतीचे ऐतिहासिक महत्व अधोरेखित करून त्यासाठी "बुद्ध आणि त्यांचा धम्म " हा ग्रंथ प्रमाण मानावा असे मत मांडून या पुस्तकाचा समारोप केला आहे. पुण्याच्या सुगावा प्रकाशनाने जुलै 2008 मध्येे हे 127 पानाचे पुस्तक वाचकांच्या हाती देऊन बौद्ध वाड्.मयातील मौलिक ठेवा जोपासला आहे. ह्या पुस्तकाच्या लेखनासाठी संजय डोंगरे यांना खूप खूप धन्यवाद देतो कारण त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून आपला देदिप्यमान इतिहास डोळ्यासमोर ठेवला.
डॉ मच्छिंद्र चोरमारे.
.....

No comments:

Post a Comment

सहवास