"नाव काय गं त्यांचं"
"डॉ. वसंत थो रा त "
"आणि वय ११० वर्षे आहे असं सांगितलंय परीचयात"
"होय, आणि अजूनही शहरभर ते सायकलने फिरतात बाबू"
"अगं, राणी या व्याख्याना नंतरही ते सायकलने जाणार म्हणे"
"कुठे मुंबईला!"
"ए ए मुलांनो भाषण ऐकताय की आपसात गोष्टी करताय"
" शू ssss"
"शू sssss"
"तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो ..मी आजही सतत आठ तास बसून वाचन करतो.१० कि मी सायकल चालवतो. आणि वाचलेल्या भागाचे १तास चिंतन करतो... ते मला सापडलेल्या प्रकाशा मुळे. ह्या प्रकाशाचा तुम्हीही शोध घ्या .तो कसा घ्यायचा आणि कुठे शोधायचा ते तुम्हीच ठरवा. तरुणांनी स्वतःची क्रांती स्वतःच करायची असते.तर एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो."
"!"
"?"
" "
" "
"काय विचार करतोस"
"तोच ,जो तुझ्या मनात आहे"
"हाहाहा"
"हाहाहा"
***
२.
"काय सुरेख चित्र काढतोस रे बाबू तू"
"एवढी स्तुती नको करू राणी"
"स्तुती असली तरी ती खोटी नाही बाबू. खरंच तू चित्र सुंदर काढतोस"
"आणि तू गातेस किती छान. तुझ्यासारखा सुरेल गळा सर्वांनाच नाही लाभत."
"गळ्याचं काय, तो कमावता येतो तालीम करून, रियाझ करून."
"रियाझ काही भसाड्या आवाजात नाही करता यायचा."
"चित्र देखील नुसती शिकून नाही काढता यायची. ती आतल्या बोटांतून यायला हवी असतात."
"ते तुझं बरोबरच आहे गं. पण मला एक कळत नाही"
"कोणतं?"
"आपण वर्ग समीकरण शिकतो, घातांक शिकतो, पदावली शिकतो. पाठ केलं की ते आपल्याला येतं. मग गायनाचंही, चित्रकलेचंही तसंच असायला हवं होतं ना. पण नाही"
"तेच तर मी म्हणते, आपण विविध देशांच्या राजधान्या पाठ करतो. समदाब रेषा काढू शकतो. सनावळ्या पाठ करतो. सर्वांनाच ते येतं.सर म्हणतात बरोबर आहे.पण गायनात तसं नाही."
"कसं"
"एखादी कव्वाली वामनदादा कार्डकांनी गायली ती वेगळी, भीमसेन जोशींनी गायली ती वेगळी, फय्याजने गायली ती वेगळी, कुमार गंधर्वांनी गायली ती वेगळी. त्यात मात्र वेगवेगळे स्तर .वेगळाले प्रकार."
"हॉना.. साधं एखादं माणसाचं चित्र घे. श्रीधर अंभोरेंनी काढलं ते वेगळं, हुसेननी काढलं ते वेगळं, अवचटांनी काढलं ते वेगळं, परसवाळेंनी काढलं ते वेगळं.ह्यात मात्र वेगळेपणा"
"मी म्हणते का?"
"मी सुद्धा म्हणतो, का?"

३.
"बाबू फारच लवकर निघालास रे आज."
"आणि तू...."
"आज आम्हाला परिपाठ सादर करायचा आहे..... आणि तू."
"मी आज प्रकाशाशी बोलणार आहे."
"अय्या s खरंच!पण शाळेत कसा काय बोलणार तू त्याच्याशी."
"अगं त्यात काय आहे एवढं घाबरायला.. आणि मी शाळेत देखील बोललो असतो. पण सोबत तू असायला हवीस ना."
"तेच तर म्हणतेय मी. आपण ठरविल्या नुसार माझ्याशिवाय तू प्रकाशाशी कसा काय बोलू शकतोस. नाहीच ना. आणि तो तरी कसा काय तयार होईल तुझाशी एकट्याशी बोलायला.अं की त्या सरांच्या मुलीला ,मीनाला केलंस पार्टनर."
"नाही ग यात पार्टनर बदलता येत नाही शेवटपर्यंत..ते जाऊ दे आजच्या दिवस येना ग राणी माझासोबत, प्लिज ss ..परिपाठाला दे चाट."
"नाही रे बाबा. मुळीच नाही. महिन्यातून एकदाच येते आमची पाळी. एक सुंदर गोष्ट मी वाचून ठेवली आहे.आधीच चांगली तयारी करून ठेवली आहे... आणि बघ आधी जे ठरवलं ते टाकून मी तुझ्यासोबत मुळीच येणार नाही. अंडरस्टँड..?"
"असं गं काय राणी."
"अरे ,मी नाही म्हणाले नं एकदा. तू माझ्यापेक्षा वीतभर उंच असशील. तुझे डोळे काळेभोर असतील. तुझं नाक धारदार असेल. तुझा सावळा रंग असला तरी मला आवडत असेल. तुझ्या डोक्यात भोवरा असल्याने तुला भांग पाडता येत नसेल. तुझं दिलखुलास खळाळून हसणं मला आवडत असेल ...तरीही.. तरीही मी येणार नाही. कारण हातचं सोडून पळत्याच्या पाठी मला लागायचं नाही."

४.
"राणी sss ए s राणी. अगं थांबतेस का?हं s अगं..?"
"अरे अरे थांब थांब .श्वास घे थोडा. सोड. घे. सोड. चल, एवढ्या वेगात धावत यायला मी पळून जात होते की काय... की विमानात उडून..?कशासाठी ओरडतोस?"
"सांगतो सांगतो."
"हो हो सांग सांग बाबा सांग."
"अगं अशी वेडावून नको दाखवू. तुला एक गंमत सांगणार आहे मी."
"गंमत?हो का रे, अरे व्वा बाबू सांग सांग लवकर सांग."
"आमच्या शाळेत सगळे विद्यार्थी प्रकल्प राबवित आहेत."
"प्रकल्प काय .छान छान. तुमची शाळा डिजिटल झाली ना."
"हो .मागच्याच महिन्यात. शाळेतून निघावस वाटत नाही."
"हं सुधरतोयस बाबू तू. पण प्रकल्प कोणता आहे गटाचा की वयक्तिक."
"काहींचा गटाचा आहे काहींचा वयक्तिक आहे."
"तू कोणता घेतलास"
"गटाचा"
"तसं नाही रे विषय कोणता आहे"
"नाही नाही, इतका छान विषय आहे गं प्रकल्पाचा ,आमचा."
"मला शाळेत जायला उशीर होतोय, निघते मी"
"नंतर सांगू का"
"ए हें हें .आधी अर्धचं सांगायचं. बाकीचं नंतळ. तसं नाही चालायचं. सांग पटकन कोणता प्रकल्प आहे ते"
"हं अह्ह्ह.. आपल्या शहरात आठव्या वर्गात शिकणाऱ्या सगळ्या मुलामुलींची संख्या मोजणे."
"बापारे.. म्हणजे तुम्हाला सगळ्या शाळांमधून फिरावे लागेल."
"म्हणूनच तर तुला सांगायला आलोय.की उद्या तुझ्या शाळेत येतोय. परवानगी मिळेल का?"
"अरे, परवानगी तर मोठ्या सरांकडूनच घ्यावी लागेल ना."
"त्यांची तर परवानगी आमच्या सरांनी घेऊन ठेवलीय. पण तुमच्या शाळेत यायचं तर तुम्हा विद्यार्थ्यांची सुद्धा परवानगी हवी ना..!!"

५.
"बाबू , उद्या आम्ही स्विमिंगला जाणार"
"स्विमिंगला..! कुठे गं ?"
"कुठे म्हणजे काय. स्विमिंग टॅंक वर"
"हं तुम्हा शहारातल्यांना स्विमिंग टॅंक शिवाय पर्यायच नाही"
"तुम्हाला आहे वाटतं पर्याय"
"नाही तर काय. आहे तर"
"हॉना. आता तू तुझ्या त्या गावातल्या नदी बद्दल सांगणार तर"
"हो , पण तुला तर ते आधीच कळलंय. कुणी सांगितलं"
"तुमच्या हॉस्टेल मधली मुलं सांगतात.. पण काय रे तुला सुद्धा नदी शिवाय पर्याय कुठे आहे?"
"अगं नदीला कुठे पर्याय असतो का?आणि असू शकतो का?"
"म्हणजे म्हणजे.."
"वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान. अगं वेडाबाई नदीचे लालित्य,नदीत उतरण्याची धुंदी तुमच्या स्विमिंग टॅन्कने येणारेय काय. मुळीच नाही."
"आमच्या स्विमिंग टॅंक मध्ये काय नाही सांग बरं."
"काहीच नाही"
"आणि तुमच्या नदीमध्ये काय आहे एवढं?"
"हं s असं शहाण्या बाळासारखं विचारायचं. मग मी बघ कसा सांगतो"
"अरे, हो बाळा.. आपलं हे बाबा.. नाही नाही बाबू सांग तुझं नदी पुराण"
"अस्स काssय .आमची एवढी लांबच लांब नदी .त्यात चार चार डोह.दोन गोल पेंड. एक घाट. एक मारतीबुवाचा ओटा. एक महादेवाच्या मंदिराचा ओटा.जिथे वाटलं तिथे पोहा. लहान मुलांनी मिरेगावच्या रस्त्यावरच्या गोलपेंडी डोहावर पोहा. मोठ्यांनी मारतीबुवाच्या ओट्यावरून चार पुरुष खोल पाण्यात उड्या माराव्या. सगळ्यात खालच्या अकोला रस्त्यावरच्या गोलपेंडी डोहावर म्हशी धुणाऱ्यांनी जावे.महादेवाच्या मंदिरावरच्या पायऱ्यांवर बायांनी कपडे धुवावे. अशी आमची नदी माय श्रेष्ठ असूनही आमचं ते नदी पुराण आणि तुमचा टॅंक म्हणजे काय सुखाची खाण!! चल जा मी नाही सांगत."
"अरे बाबा एवढा कशाला रागावतोस?आणि किती मोठ्याने बोलतोस. आजूबाजूचे लोकही आपल्याकडे पाहू लागले"
"पाहू दे .मी भीत नाही कुणाला"
"भीत नाही म्हणजे! ते आजोबा आपल्याकडे एकसारखे पाहत होते. भांडत आहोत असे वाटून आले असते सोडवायला आणि दिली असती ठेवून एक कानपट्टीत तुझ्या."
"हँ.. माझ्याच का"
"अरे नाहीतर काय .एक तर तू मुलगा आहेस आणि माझ्याशी भांडतो आहेस"
"मग ! भांडतोस म्हणजे काय! माझ्या नदीबद्दल जर कुणी बोललं तर मी त्याच्याशी भांडण देखील करायला मागे हटणार नाही"
"अच्छा म्हणजे तुमची नदी तुम्हाला भांडण सुद्धा करायला लावते!!"
"अगं हसू नकोस. ती कशाला भांडण करायला लावेल. आमची नदी म्हणजे आमची नद. आमची नदिमाय.आम्ही तिच्यात पोहतो. ती आम्हाला पोहू देते. आम्ही तिच्यात शित्तन खेळतो .ती आम्हाला खेळू देते."
"शित्तन! हा कोणता खेळ आहे रे"
"अगं. लपांडवासारखं. कुणा एकावर तरी राज्य येट. बरं मग किणी त्याने दुसऱ्या कुणाला तरी हात घालून लावायचा प्रयत्न करायचा म्हणजे शितायचं.. खूप शिकस्त करावी लागते."
"झालं ना"
"जा असं आहे तुझं. अं मी नाही सांगत."
"अहो बाबू महाराज. आय अम सॉरी.. सांग ना सांगना रे प्लिज."
" बरं. तर समजा एकावर राज्य आहे. आम्ही सगळे जण ओट्यावर उभे राहतो आणि एका सुरात म्हणतो 'डिरी' मग आम्ही चपळाईने पाण्यात उड्या मारतो. ह्या उड्या मारण्याच्या दरम्यानच खरी स्फूर्ती जागी ठेवली आणि कुणाला जर त्याने शितलं तर जिंकला. नाहीतर मग त्याला सर्वांचा पाठलाग करावा लागतो. पण तो सोपा नसतो. तो आपल्याकडे यायला लागला की आपण पाण्यात बुडी मारणार. आणि पाण्याखालून दुसरीकडे निघून जाणार. मग तो बसतो शोधत.."
"मग पकडायच तरी कसं"
"प्रत्येकाचं आपलं आपलं सूत्र असते.कुणी एकाचाच पाठलाग करतो, कुणी गर्दीवर झडप घालतो, कुणी लक्ष ठेवतो, कुणी पाण्याखाली डोळे उघडे ठेवून शोधतो, कुणी कसं ,कुणी कसं.."
"बरं बरं बरं .तर अशी असते शित्तन. एवढ्यासाठी तुला नदी आवडते. पण हे तर आमच्या स्विमिंग टॅंक मधेही खेळता येईल."
"खेळता येईल तेवढं एक आणि बाकीचं"
"बाकीचं काय आहे आणखी"
"हँ हँ"
"काय आहे आणखी सांग ना"
"ये हे रे"
"सांग ना लवकर .माझी बस येईल एवढ्यात"
"जा .."
"नाही नाही सांग रे वेळ आहे अजून बस यायला"
"ओ हो हो"
"काय झालंय"
"काही नाही सांगतोय"
"हं. आता कसं"
"काय म्हणालीस"
"काही नाही सांग सांग ऐकत्येय मी"
"अगं मस्त पैकी च्याटी करायची. च्याटी म्हणजे मुंडण. उन्हाळ्याचे दिवस असतात. नदीत जायचं. गळ्यापर्यंतच्या पाण्यात उभं राहायचं.गरम ह्वू द्यायची च्याटी.खूप गरम झालं तपिलं की पाण्यात बुडी मारायची. पाणी थंड करते.... की मग काठावरच्या मऊ वाळूत लोळायच. खूप लोळायचं. सगळं अंग रेतीने माखून घ्यायचं. हूं आवाज येतोय की सगळ्यांनी उभं राहायचं. एक्का सुरात कल्ला करायचा.. एक sss दो ss न ..साडे माडे तीन की सगळ्यांनी धावत सुटायचं नदी कडे. खोल डोहाकडे.. पाण्याकडे.. पाण्यातल्या पाण्यात धावायचं.. पाहूया कोण जास्त दूरवर धावत जातोय.. जिंकायचं आणि नदीच्या रेशमी पाण्यावर लोळण घ्यायची. पाठीवर तरंगायच ना. पायाचे अंगठे आणि कान मात्र सदैव दिसले पाहिजेत. वांढाय म्हशी इथपर्यंत आल्याच तर त्यांच्याही पाठीवरून सूर मारायचे. एखाद्याला हात उंच करून उभं करायचं. त्याच्यावरून खुप्पस मारायची. पण त्याला धक्का नाही लागू द्यायचा बरं."
"हं तर हे असले खेळ खेळतात तुम्ही नदीवर. बरं आहे"
"बरं म्हणजे ....तुम्हाला येतात का खेळता. मिरेगाव रस्त्यावरच्या गोलपेंडी डोहाचा ठाक काढता येतो का. जीव दाबून"
" अशक्यच...पण तुला आमचे बटरफ्लाय स्ट्रोक, ,वॉटर पोलो, डायव्हिंग खेळता येतात काय"
"नाव बदल. अगं नदीतल्या पोहणाऱ्याला विहिरीतल पोहणं काय कठीण आहे का?"
"विहिरीतलं म्हणजे?"
"तुमचा स्विमिंग टॅंक म्हणजे एक विहिरच ना. कोणती लहान कोणती मोठी"
"अरे स्विमिंग टॅंक कुठं .विहीर कुठं. ती आली माझी बस. बाबू येते रे"
"अरे हुट ..आली बस. राणी ये .पुढच्या शनिवारी नक्की भेटूया .प्रकाशाशी बोलायचं. आणि आणखी सांगेन तुला नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधलाय .खूप पाणी असतं .पण काही दिवसांकरताच .रेती नाही उरली. पोहणं फार जमत नाही.... अरे मी कुणाशी बोलतोय .बस तर कधीची निघून गेली.. कुणी ऐकलं तर नाही ना.. ह्या ह्या नाही।..चाला."

६.
"मीना , ए मीना ss अगं ए मीना"
"हं सांग काय आहे राणी तुझं"
"अगं फारच घाईत दिसतेस अस"
"घाईत तर आहेच गं. आणि केवढी ओरडतेस.मॅडम आहेत इथे. रागावतील ना"
"हो का बरं बाई. पण म्हटलं कसली घाई आहे एवढी."
"घाई म्हणजे!! तुला माहित नसेल .आज आमचा परिपाठ आहे म्हटलं"
"अस्स का"
"नाहीतर काय. आणि हे तुझं लांब नाक फुरफुरायला काय झालं"
"सर्दी झालीय गं"
"मला पाहून का"
"नाही गं. तू काय हिवाळा आहेस.आणि नाकाचं काय घेऊन बसलीस .तू तर ठुस्की ठास्की. मी तर तुझ्यापेक्षा चांगलीच उंच आहे. माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलींहून उंच ..."
"त्या खो खो कॅप्टन सावळ्या रुपालीपेक्षाही उंच!!"
"तिच्या बरोबरीनेच.पण माझ्या गोऱ्यापान रंगाला माझे लांब सडक बोटं बघ किती शोभून दिसतात."
"आणि तुझे ते किंचित सोनेरी केस. पिंगट डोळे .उजवी भीवई जराजराशाने वर जात असलेली.आणि डाव्या हाताला किनई सदानकदा रुमाल .....जाते बाई"
"अगं असं गं काय करतेयस मिनुटले.परिपाठात काय सादर करतेस हे सांगना गड्या."
"राष्ट्रभक्तीपर गीत गाणार आहे"
"हो ss य्य !! कुठलं गं"
"सांगते.(आधी त्या रुमालाचा वापर कर एकदा. हं छान) हम होंगे काम्याब एक दिन."
"अय्या खरंच.... म्हणूनच घोकत होतीस कालपासून(आता उजव्या पायाने रेती सारव)"
"मग आहेस कुठं. पूर्ण पाठ केलं ना.(का म्हणून विचार)"
"का गं"(झालं का सारवून .आता डाव्या हाताच्या करंगळीच्या नखातला मळ काढ.)"
"माझं सादरीकरण तुला आठवत राहिलं पाहिजे ना वर्षभर."
"हो हो चल टोल पडला प्रार्थनेचा."
"हो हो चल"(आता हिने रुमाल का बरं नाही वापरला)
"(आता दोन्ही हात ..केसांवरून फिरवत जा प्रार्थनेला)
"मीना मधल्या सुट्टीत भेटूया गं"
"हो हो..(हिने रुमाल वापरायला हवा आता.)
"किती छान परिपाठ झाला गं तुमचा"
"थँक्यू, आठवडाभर आम्ही नुसती तयारी करीत होतो. मी गट प्रमुख आहे ना"
"हं म्हणूनच (चढली ) अभ्यासक्रम संपलाय का तुमचा"
"आलाय संपत. आणि तुमचा गं"
"झालाच म्हणून समज. विज्ञानाच एक राहिलंय प्र -क -र- ण -"
"आमचं भाषेचं हे एक प्रकरण आलं की आमचंही तसंच"
"मग काय परीक्षा न परीक्षा झालं"
"हो का. आणि हे मधलं आहे न. गृहपाठ. स्वाध्याय. प्रात्यक्षिके. प्रयोग. सगळी टिपणं सिद्ध करावी लागतील. आणि शिक्षक लोक रिव्हिजन घेतात .कसली सुट्टी न कसलं काय."
"आज तू डबा नाहीस खाणार आहेस"
"का? तुला हवाय का तो"
"नाही ग .पटकन खाऊया. अन त्या पेरूच्या झाडाखाली बसूया.किती ऊन लागतंय"
"हो चल ये पटकन इथे"
"राणी ,घंटा वाजायच्या आधीच तुमचा वर्ग बाहेर आला गं"
"नाही ..आम्ही बाहेर आलो नि घंटा वाजली. शेवटचा तास ऑफ होता आमचा .तुझं लक्ष इकडेच ना"
"नाही सहज आपलं खिडकीतून पाहत होते.बरे ....तू कॉम्प्यूटर क्लास लावलाय म्हणे."
"कोण"
"मीच म्हणतेय"
"हो लावलाय .पण दोन महिने झाले गं त्याला. आणि तुला आता कळले. पण का , तुला लावायचाय का?"
"हो ह्या सुट्टीत"
"कशासाठी"
"खूप खेळ असतात न त्यात"
"खेळ...!! हो हो हो खूप खेळ असतात त्यात."
"त्यासाठीच लावायचाय मला क्लास"
"अगं मग आमच्याच संस्थेत लाव की"
"चालेल"
"विचारू का सरांना. बरं कधी लावतेस."
"सुट्टीत "
***
७.
"सर सर ह्या वेबसाईट मधला आणखी आणखी आतला आतला मजकूर वाचायचा आहे मला.तो कसा वाचता येईल सर!(आता पॅन्ट च्या उजव्या खिशात हात घाला. त्यातले दोन चार दाणे टाका तोंडात)"
"कोण तू ? राणी का... हं हं हं वाटलंच मला .तू राणीच असणारे .तुझे जे काहीतरी असेल ते ब्रिलीयंटच असणारे. हं बघू कोणती वेबसाईट असणारे तुझी?"
"www.sunsure.com.in सर"
"अच्छा ही का ..ही वैज्ञानिक वेबसाईट असणारे. फार मोठ मोठ्या वैज्ञानिकांनी लिहिलेली वेबसाईट असणारे हे. हे बघ कार्टून्स वेबसाईट .हे बघ पेंट. हे मुलांचे वेबसाईट असणारे .हे असे काढायचे .हे असे बोट फिरवायचे. असे हे वेबसाईट असणारे. आलं लक्षात. मला वाटतं. लक्षात आलं असणारे....!!"
"होय सर. लक्षात आलं हे असणारे ना."
"ख ख ख् छान.येतो मी"
"होय सर"(सर आता या बाजूला फिरकायचे नाहीत. जेवढी पाहता येईल. तेवढी घेते पाहून... अरे अरे हे काय ..या वेबसाईट मध्ये हे काय दिसतंय)

८.
"बाबू बाबू बाबू अरे आनंदाची बातमी ऐक"
"वावावा सांग सांग पटकन"
"अरे मी ती वेबसाईट उघडली होती, आपली"
"खरंच ! मग तो बोलला असेल ना तुझ्याशी.. मनसोक्त"
"अरे कशाचं काय"
"काग का"
"काय "
"तेच तर म्हणतोय ,तो तुझ्याशी एकटीशी कसा काय बोलेल.तुला माहिती नव्हत का?"
"अरे ते तर नंतरच झालं. मी माझ्या अंगठ्याचा ठसा कुठे दिला होता त्याला."
"हो का अजब झालेलं दिसतंय"
"हो ना. मी वेबसाईट उघडली आणि सर्फिंग करू लागले. माऊस फिरवू लागले. कर्सर फिरू लागला.बाणाच टोक फिरू लागलं.."
"अगं लवकर लवकर सांग .उगाच ताणू नको. मी उतावीळ झालोय. तुला माहिती आहे जास्त ताणल्यास...."
" माऊसचं चाकच जॅम झालं"
"हं मग?"
"मला कर्सरच हलवता येत नव्हता."
" घ्या ss सारं कामच थांबलं असेल मग"
"हो नं"
"मग"
"मग काय"
"तुला एवढं सुद्धा कळलं नाही"
"एवढं सुद्धा म्हणजे"
"नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की.. एंटर मारायचं आणि की बोर्ड वरून करायचं आपलं काम."
"ते नाही आलं मला.एवढयात सर आले"
"घ्या ss मग तर सारं कामच बिघडलं असणार. त्यानला काय सांगणार."
"हॉना. आधीच ते काय काय बोलून गेले. अशा वेळी ते परत येत नसतात. कालच कसे काय परतले कुणास ठाऊक."
"मग काय ..."
"अरे ,कशाचं काय. मी कॉम्प्युटर तर बंदच करून ठेवला होता."
"अगं अशान हँग होईल ना तो कॉम्प्युटर.. शेवटी तेच खरं."
"काय"
"स्त्रिया आयुष्यभर भात शिजवतात .तरीही प्रत्येकवेळी तो शिजला की नाही हे पाहण्यास त्याची शीतं दाबुनच पाहतात."
"तुला काय म्हणायचं आहे"
"सहज बोललोय. वाईट वाटलं का..."
"नाही रे. सहज असेल तर ठीक आहे. आता माझे आभार मान"
"ते का बुवा."
"कारण टिंगल केली असतीस तर कानाखाली जाळ काढला असता."
"बरं बाबा आभारी आहे तुझा."
"अरे असं कसं"
"कसं"
"तुला काहीच वाटलं नाही मी बोलल्याचं !!"
"अगं, ज्यात वाईट वाटतं ती मैत्री कसली..."

९.
"अगं राणी त्या मोटारी खाली जाशील ना. बाजूला सरक."
"अरे मी कशाला त्या मोटारी खाली चेंगरणार. तू असा आरडा ओरडा केला ना मग मात्र काही खरं नाही बरं."
"काय ही गर्दी. हे शहर म्हणजे गोठाण आहे.कुणाचा कुणाला पत्ता नाही अन गायक्याची मात्र सत्ता नाही.कुणीही येतो नि हाकलतो."
"त्यालाच शहर असे म्हणतात"
"ते असेल ,पण मला नाही आवडलं हे"
"काय"
"हा धूर. ही धूळ. सारी मळमळ."
"पिझ्झा आणि आईस्क्रीम आवडलं?"
"हो ते छान होतं."
"बाबू, त्यालाही शहर म्हणतात."
"होहो .ते नाट्यगृह पण आवडलं मला. खूप खूप. तिथे नेहमी नाटकं होतात का गं. जिवंत माणसांची?"
"अरे तिथेच नाही. अशी चार नाट्यगृह आहेत .तिथेही नाटकच होतात. सतत."
"आणि ते पावभाजी भांडारच्या समोरचं दुकान पण आवडलं मला."
"कोणतं?"
"ते ...जिथे सगळ्याच वस्तू मिळतात....पुस्तके, दप्तर, कपडे ,बूट, चॉकलेट, पेन, सगळं एकाच ठिकाणी."
"त्याला मॉल म्हणतात."
"अच्छा मॉल काय हं.. ही डावीकडे सर्कस आली की काय "
"नाही तो शॉपिंग मेला आहे.. तिथेही अनेक वस्तू विकत घेता येतात. पण ही जत्रा काही दिवसांसाठीच असते.."
"हा आकाश पाळणा.."
" खरेदी दरम्यानचा विरंगुळा आहे तो. आपल्या साठी आणि त्यांच्याही साठी"
"ते कोण"
"चल पुढे .आपल्याला सिग्नल मिळाला. नाहीतर आणखी अडकून पडू."
"हँ हँ हँ हँ हँ हँ हँ"

१०.
"काय राणी गेल्या आठवड्यात दिसलीच नाहीस"
"नाहीरे, मला इथे येताच आलं नाही"
"मी कित्ती वाट पाहिली तुझी"
"हो का .काय करावं गड्या जमलंच नाही"
"काय विशेष"
"शनिवारी आमच्याकडे पाहूणे आले होते .ते डॉक्टर काका. तुला सांगते बाबू ते कवी पण आहेत बरं"
"अरे व्वा तुमच्या कडे कवी सुद्धा पाहुणे येतात तर"
"हो तर,त्यांनी खूप छान छान कविता लिहिल्या आहेत."
"आता तू मला कविता ऐकविणार आहेस ना"
"सांगते रे. आठवू दे मला.सांगते"
"आठव आणि सांग"
"ऐक.. माकडाच अंगण जंगल भर।
कोण बांधून देईल त्याला छानसं घर।।
ससोबाच बीळ, चिमणीचा खोपा।
मुंगीचं वारूळ त्यात नागाच्या झोपा।
"अरे वा खूपच मजेदार आहे गं ही कविता अं"
"आणखी सांगू"
"सांग सांग मस्त मजा येते आहे."
"उंदीर अंगण रंगवितो
संपतचा रंग संपवितो
बोकोबा अंगण रंगवितो
संपतचा रंग संपवितो
कोकीळा अंगण रंगविते
संपतचा रंग संपविते
कावळा अंगण रंगवितो
संपतचा रंग संपवितो
चिमणी अंगण रंगविते
संपतचा रंग संपविते
कोंबडा अंगण रंगवितो
संपतचा रंग संपवितो
हरीण अंगण रंगविते
"हो हो आणि संपतचा रंग संपविते ,बरोबर?"
"बरोबर"
"ह्या संपतचा रंग कधी संपतच नाही ना..."
"दुसरी ऐकवू का"
"बापरे एवढ्या कविता पाठ आहेत का तुझ्या"
"अं sss"
"त्यांचं पुस्तक आहे का"
"नाही .पण त्यांनी ज्या डायरीत कविता लिहिल्या होत्या त्यांची झेरॉक्स आहे मजजवळ."
"बघू"
"हे घे"
"वॉव किती सुंदर अक्षर आहे डॉक्टर काकांचं .लांब .उभट. तिरप.दोन शब्दात सारखं अंतर. दोन ओळींत सारखं अंतर. अस्स अक्षर मला काढता यायला पाहिजे."
"त्यात काय कठीण आहे"
"कसं काय "
"क्लास असतात ना त्याचे पण"
"पण क्लासात जाऊन असं अक्षर काढता येतं!"
"सुंदर अक्षराची हमी घेतात ते"
"आता बदल झाला राणी "
"अरे ते शिकावं लागतं आणि आलेलं वळण कायम राखाव लागतं."
"सुंदर अक्षराला सोबत ऱ्हस्व दीर्घ आणि विरंचिन्हांचीही हवी ना"
"ते पण शक्य आहे"
"हो ss!!!! कसं काय?"
" आमचे पोहरकर सर सांगत होते"
"काय"
"लिहिल्यानंतर नव्हे तर लिहिण्यापूर्वी क्षणभर विचार करा. म्हणजे आज्जीबात चुकणार नाही"

११.
"राणी, आज मी पक्का निश्चय करून आलो आलो आहे."
"हं आता कशाचा.."
"खोटं सांगत नाही आहे …आज बोलायचं म्हणजे बोलायचंच"
"नक्की ?"
"हो नक्की"
"कसं शक्य आहे ते?"
"का शक्य नाही. तुला माहिती आहे ना मी जिद्दीला पेटलो तर.."
"ते बरोबर आहे तुझं.अशक्य हा शब्द दोघांच्या शब्दकोशात नाही. नेपोलियन च्या आणि तुझ्या. पण माझं म्हणणं असं आलं की आज शनिवार सकाळची शाळा .मग कॉम्प्यूटर कोणता मिळणार आहे प्रकाशाशी बोलायला."
"अगं शहरात इंटरनेट कॅफे वर जाऊया ना"
"पण तिथे पैसे लागतात बाबू . तासाप्रमाणे ."
" हे तुला मीच सांगितलंय बरं"
"हो तेही खरं आहे."
"मग काय"
"जाऊया ना. आई बाबांना विचारून तुला फोन करते. मग तू ये."
"आणि पैसे पण घेऊन येशील"
"वा का नाही.मी माझे पैसे आणीन"
"अगं एकाच्याच भाड्यात दोघेही बघू ना"
"मग मी अर्धेच पैसे भरीन"
"बरं बाबा ठीक आहे आणि जेवण करून येशील"
"का"
"हो नाहीतर .हे खाऊ ते खाऊ त्यातच सारा वेळ जायचा."
"हो हो चल"

१२.
"अरे बाबू , दहा मिण्ट झालीत तू खटपट करतोस ती वेब साईट शोधायला. राहीलीत किती अशी एका तासातली मिण्ट"
"अगं हळू बोल गं , आधीच तो अपल्याला या कॅफेत प्रवेशही द्यायला तयार नव्हता. आधी त्याने आपली प्रवेशपूर्व चाचणीच घेतली "
"मी होते म्हणून बरं. किती चटचट उत्तरं दिलीत मी"
"कॉम्प्युटर च्या मॅडम. तुम्ही फक्त दुजोरा देत होता. एवढं लक्षात आहे ना."
"आणखी त्यातली पाच मिण्ट गेली. कर लवकर खटपट. की त्यांना बोलवायचं"
"नको, आपणच शोधायचं"
"अच्छा तर मग असं कर "
"कसं"
"परत एकदा सुरवातीपासून तपासत घे"
"होय, बरोबर आहे तुझं ,तसंच करावं लागणार.... हा..इथपर्यंत तर पोचलो. पण इथपर्यंत तर मघाशी पण पोचलो होतो आपण. काहीतरी विसरलेले दिसतेय."
"बघू इथे काय आहे.. इन्सर्ट असं लिहिलं आहे. काहीतरी टाकायला सांगतो आहे तो. इन्सर्ट म्हणजे समावेश करा. पंचवीस मिण्ट झालीत."
"पाहू.... थंब असं म्हणतोय. हं .अगं आपण आपल्या अंगठ्याचे ठसे कुठे दिलेत अजून"
"अरे खरच , चल चिकटव लवकर."
"हो लवकर चिकटव तुझा पण अंगठा, त्या चौकोनात.४५ मिण्ट होऊन गेलेली आहेत"
"हां उघडली किणी आपण ही वेबसाईट.www.sunsure.com.in किती तेजस्वी अक्षरं आहेत रे ही."
"हं sss खरंच चला आता आपल्या प्राणप्रिय प्रकाशाकडे. अरे हे काय ,काय आहे हे, हे काय आलंय बघ राणी."
"(तुझे डोळे का बंद आहेत गाढवा)बघू बघू अरे हे काय,"
"तेच तर म्हणतोय मी पण. वाचलस ना तू सॉरी..sorry once a day only."
"म्हणजे याचा अर्थ काय"
"नाही का, ह्याचा अर्थ म्हणजे दिवसातून एकदाच"
"ते तर झालच रे.. आणि त्या आधी सॉरी"
"म्हणजे..!!"
"म्हणजे ह्याचा अर्थ सरळ हा आहे की आपल्याही आधी ही वेबसाईट आजच कुणीतरी पहिली आहे."
"करेक्ट, म्हणजे याच ठिकाणी ही वेबसाईट आपल्याशिवाय कुणीतरी पाहत."
"नक्कीच ,पण कोण पाहत"
"ह्याचा शोध आपल्याला लागलाच पाहिजे. मीना तर नसेल..!"
"काय सांगावं. पण ती तर ब्युटी पार्लर वाली. आता काय करायचं?"
"आता तो कॅफेचा मालक उठलाय. आपल्याकडे येतोय.१तास होऊन गेलेला आहे."

१३.
"काय रे बाबू बर नाही वाटत आहे का"
"नाही गं"
"चेहरा उतरलाय"
"तसं काही नाही.. आता परत प्रयत्न करावा लागेल ना आपल्याला."
"जाऊ दे काही टेन्शन घेऊ नको. पाहून घेऊ"
"ते तर आहेच म्हणा पण मी जरा वेगळ्याच विचारामध्ये आहे."
"कोण्टा विचार"
"त्या प्रदीप वाडेकरचा"
"तो तुझा मिरेगाव चा मित्र!"
"हं"
"त्याचं काय"
"अगं चार दिवस झाले तो आजारी पडून आहे."
"तुझ्या विचार करण्यानं तो बरा होणारे का?"
"ते तुझं बरोबर आहे पण मी त्याला अजून भेटायलाही नाही ना गेलो."
"मग जा ना ,विचार कसला करतोस"
"तोच विचार करतोय मी"
"परत विचार. बरं झालंय तरी काय त्याला."
"अगं आमची सहल गेली होती चिंच धरणावर.."
"बर मग"
"तेव्हापासून तो आजारी आहे"
"मलाही खूप पाहावस वाटतं ते पण त्यामुळे आजार होत असेल तर..!!"
"अगं तसं नाही गं धरण तर कुणालाही पाहावस वाटतच. त्याचा संबंध काय आहे.."
"मग झालं काय तिथे"
"त्याचं असं झाल राणी, आम्ही तिथे पोचलो. सरांनी आम्हाला सूचना दिल्या. धारणाच्या त्या टोकाला असणाऱ्या मोकळ्या जागेत जायचं होतं. पैदल. त्या मातीच्या धरणावरून अडीच किमी चालत आम्ही निघालो. प्रदीप ,मी आणि आणखी तिघे. असे सर्वजण. आम्ही सोबत सोबत चालत होतो. समोर भलामोठा डोंगर होता. त्या डोंगराच्या आधारानेच धरण बांधलेलं. प्रदीपला शक्कल सुचली. तो हलकेच म्हणाला,'ह्या डोंगराच्या टोकावर काय असेल?'आम्ही सगळेच स्तिमित झालो. आमचं कुतूहल वाढू लागलं. आणि आम्ही प्रदीपच्या म्हणण्याला कधीचाच दुजोरा देऊन टाकला. ते पाहायचंच ह्या इराद्याने आम्ही पाचही जण ठाम होत गेलं. सगळी मुलं सर मॅडम गप्पा गोष्टी करीत पूढेपुढे जाऊ लागले. आम्ही सांडव्या जवळ पोचलो नि खाली उतरलो झपाझपा डोंगराच्या झाडीत पोचलो. निर्धास्त होतो. प्रदीप म्हणाला ,चला... मग भराभरा तो डोंगर चढू लागलो. काही पिवळी जर्द डोंगरी फुलं दिसली. काही गुंजे एवढ्या आकाराची लाल भडक. काही काळी शार फळं. एकाने कोल्ह्याच्या लेंड्या घेतल्या. एकाने विचित्र दिसणारे दगड. वर्णन करता येणार नाही असा रंग असलेली पांढुरकी माती. मनोवेधक आकार प्राप्त झालेल्या निबर काटक्या. जे जे जमेल ते ते गोळा केले. आम्हाला कशाचच भान नव्हत .डोंगराच्या शेंड्यावर जाणे हेच आमचे ध्येय होते. थंडगार वारे उल्हसित करीत होते. जेव्हा डोंगर माथ्यावर पोचलो तेव्हा डोक्यावर विस्तीर्ण गगन होते आणि त्यात आमचा आनंद मावत नव्हता. दमलो नाही. थकलो नाही. बसलो नाही. फळं खावीशी वाटली पण ती विषारी असू शकतात म्हणून त्यांना दात लावला नाही. बराच वेळ थंडगार हवा खात राहिलो"
"खूप वेळ झाला होता का."
"झाला तर होताच. इकडे त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले. गाणी गोष्टी गप्पा त्या विशाल जलाशयाच्या किनाऱ्यावर त्यांनी केल्या. थंडगार वाळूत बसले.मुलांना खाऊ मीळाला .शेवटी शेवटी आम्ही पोचलो."
"व्यवस्थीत पोचलात नं"
"पोचलोय खरं. पण पुढे ऐक. सरांनी आम्हाला जॅम शिक्षा केली. आणि ती प्रदीपला सहन झाली नसावी.

Sent from my Samsung Galaxy smartphone.
Reply
Forward
View Gmail in: Mobile | Older version | Desktop
© 2017 Google
No comments:
Post a Comment