अरिय ARIY
एका विश्वाचे आखर
-
एका विश्वाचे आखर
एका विश्वाचे आखर
आता अपुरे पडते
तुझ्या चेतनेने बापा
ऊजेडाची गती येते
तूच दिले सूर्याच्याही
मंडळाला दहा डोळे
पाहायला शिकवले
त्याला आमचे सोहळे
तुझ्या शक्तीतला पान्हा
पाजलास दिन रात
युक्ती आम्हा जगण्याची
तूच दिली , दायभात
चिमटीत क्षितिजाला
तूच आमुच्या दिलेले
विजांनाही डोळ्यातून
बापा तूच ऊगू दिले
तुझ्या फक्त असण्याने
पेटे रुधिराची वात
देह होई रानवारा
नसे कशाची ददात
तुझी आठवण पोही
बापा मेंदूच्या पाण्यात
श्वास- वास- अन्न
तूच आमच्या प्राणात
नाही समजत काही
काय करावे न सुचे
ज्याच्या साठी झगडलो
त्याचे कसे करायचे
- एका विश्वाचे आखरएका विश्वाचे आखर
आता अपुरे पडते
तुझ्या चेतनेने बापा
ऊजेडाची गती येतेतूच दिले सूर्याच्याही
मंडळाला दहा डोळे
पाहायला शिकवले
त्याला आमचे सोहळेतुझ्या शक्तीतला पान्हा
पाजलास दिन रात
युक्ती आम्हा जगण्याची
तूच दिली , दायभातचिमटीत क्षितिजाला
तूच आमुच्या दिलेले
विजांनाही डोळ्यातून
बापा तूच ऊगू दिलेतुझ्या फक्त असण्याने
पेटे रुधिराची वात
देह होई रानवारा
नसे कशाची ददाततुझी आठवण पोही
बापा मेंदूच्या पाण्यात
श्वास- वास- अन्न
तूच आमच्या प्राणातनाही समजत काही
काय करावे न सुचे
ज्याच्या साठी झगडलो
त्याचे कसे करायचे
View comments
-
Loading
■वस्तीत
वस्तीत उद्याच्या गाढ झोपलो आहे
मी येणाऱ्याचे शव नाकारीत नाही
फुंकतो प्राण, छातीत ओततो श्वास
अन परत धावतो,वस्ती करीत नाही.
●
■दुकानदार
•आमच्याही माणसांना लुटतो आम्ही
•कुठे आहे जातीयवाद
:समानता
•••••
■ वारा
बंद दाराआड येतो
वारा उगीच पाहुणा
हलकेच उकलतो
साऱ्या घामेजल्या मना
जीवन विणीत येते
जीवन विणीत येते आपापले कलम।
माणूस तोच होई कलम।
परिशिष्ट भोवताली , नजरा बचावण्याला
दिसते तरीही तयां , का नागडे कलम ?
नाही मुळीच नाही जाणे तिथे पुन्हा
जे त्यागले ,परत ते पाहू नये ,कलम ।
फिरवून पाठ अपुली हाती मिळे न काही
चेहऱ्यातूनी घुसाडा एकविसवे कलम ।
घटनेत वाच अपुल्या आयुष्य गंधणारे
फुलवी प्रहर शशी चे प्रत्येक हे कलम ।
खातो पितो उगवतो निजतो तृणांसवे।
केव्हाही बोट ठेवा हसतो कलम कलम।
केल्या किती विनंत्या देवा दिका तरीही।
पाऊस येत नाही -नसते असे कलम।•••••••••••••••••••••••
रेंज
आकाशगंगे सारखे पृथ्वीभरआपण विखुरलेलो होतो…
हुडहुडी भरल्यासारखे थरथरत उभे होतो
प्रत्येक धर्माच्या दरवाजा बाहेर
आपलं एकंदरीत सगळं काही एकसारखंच होतं
पण होतो एकमेकांना अनभिज्ञ
तो जन्माला आला आपला मायबाप बोधिसत्व
त्याने दाखवून दिले आपल्याला आपलेच स्वत्व
आता-
पृथ्वीच्या परिघावर कुठेही असलो तरी
आपण एकमेकांना ओळखू शकतो.
बिनधास्त पणाने
आपली लेकरं बाकर
धर्माची गोळी करून अकरा ढोकरा खेळतात
आणि
मानवी सभ्यतेचे लेटेस्ट व्हॅर्शन असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावानेच्या विविध प्रारूपांची निर्मिती करून देशाला दान करतात..
ह्या दात्या हातांना तो काय देऊ
शकणार
तेवढं एक ऐकू यायला पाहिजे
~संजय डोंगरे~
तुझ्या डोळ्यातले काषाय वस्त्र...
बुढैत्ला घाम दिसू दिला नाही
रंगरंगांची गोधडीच फक्त दिस्ली
दोन रंगांचे जोडे
किर्तनात्ला अस्सल माण्सी स्वर
आप्ल्या वऱ्हाडी मायबोलीचा चिचोनी हेल.
धर्मशाळा बांधून धर्माला उचकटून टाकतांना
खराट्याचा झपका खाण्यासाठी आसुसलेल्या प्रतिक्षारत गावात
शाळांचे हस्तांतरण करतांना,अंगठ्याच्या ठश्याने
निसर्गाने लेहेलेल पुस्तक वाचतांना
भोंगया झाडाखाली हातावर कुणीतरी दिलेली भाकर खातांना
देवं माय पानी प्याले... असा प्रत्यय घेतांना
शेवटी तुझ्या झोपडी समोरच्या पाण्याची टाकी कधीच
रिकामी झाली नाही।
अन् कानातल्या कवडीचं रहस्य कोणत्याही शास्त्रज्ञाला उलगडलं नाही।
अशा कोणत्या जहाजातून तू
तुझ्या आयुष्याचं विमान उडवलंस
की जिथून प्रज्ञा शील करूणेच्या बीजवाईला सींचत होतास,
छातीत्ला ठस्का पूर्णत: थांबेपर्यंत
तुझ्या अंगावरचा पंचरंगी ध्वज जराही मळू दिला नाहीस,
जॉर्ज वॉशिंग्टन कॉर्व्हर सारखा
तुझ्या डोळ्यातले काषायवस्त्र बाबासाहेबांना
शोधत राहीले आशेने
मन माण्सी अवस्थेने ओथंबून आले की
पहीली ओळ हेच तुझ्या गजलेचे वृत्त असते।।
बुढैत्ला घाम दिसू दिला नाही
भैय्यासाहेब
तुम्ही फिरवली भीमज्योत......
तुम्ही ठरलात सारिपुत्त दादासाहेबांसारख्या महामोग्गलानांसमवेत
तुम्ही भारतीय बौद्ध महासभेला वेग दिलात
तिला होऊ दिले भारिप ची मातृसंघटना
वाढवला त्रिज्या व्यास परिघ प्रतलांचा अमर्यादपणा
एक पैसाही तुम्ही जगला नाहीत स्वत:साठी
तुम्ही महाकाश्यप गरीबांच्या वस्तीत भिक्षाटन करणारे
बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तिसाठी झटत राहिलात अव्याहत
वातविकाराची तमा नाही बाळगली
तुम्ही निर्माण केले बौद्धाचार्य आणि
मानवमुक्तीची एक चावी ठेवली अलगद आमच्या हातात
बौद्धमय भारताचे स्वप्न तुम्हीही पेरले होते त्यात
तुम्ही ऊभे केले अनाथपिंडक आपल्यात
बाबासाहेबांचा लळा
तुमच्यावर निरतिशय जिव्हाळा
तुम्ही राहुलकाया
सद्धम्माची हीर्वीगार छाया
भैयासाहेबांचे
विहारो विहारी
त्याग नि श्रमाचे
गुणगाण
------
हवा
झाडांना हलवते हवाआणि पक्षी अलगद येऊन बसतात
झाडांच्या तरंगत्या डहाळीवर
अनित्यत्वाचे झोके घेतात
गोष्टी करतात
बोलतात
अंडर ग्राउंड केबल्सचे लिकेजेस
वरून नसतात दिसत
त्यांचा शोध घेण्यासाठी जमीन खोदत जावे लागते
कशीच्या कशीच
जमिनीचं काय बिचारीचं
तिच्या पोटातले जीव जंतू
तसेही तिला पोखरत असतातच
म्हणून जमीनीने कधीच
कुणाची साक्ष मागितली नाही
कशाला हवी आहे साक्ष
तिचं तसंच असते
काय पहावं
पंख्याच बटण सुरु करायच
हवा येते
गार येते
गरम जाते
......
क्षणथेंब
एक थेंब जगण्याचापसरत जाणारा विश्वभर
त्याचे अस्तित्वच पिसाटासारखे शोधत राहावे
असे वाटावे
एक क्षण
अर्थहीन संदर्भांचा
चेहरा मोहरा नसणारा
आयुष्याचे उखाणे सोडवता सोडवता
अवयवांना उकलवणारा
अमिबा सारखा
थेंब
क्षण
एकच असतात
अभिन्न
***
आठवण
आईचे आसू
भावाचा चेहरा केविलवाणा
हे आण ते आण म्हणणारी बहीण
मनीऑर्डरी साठी तकतक हिंडणारा बाप
खोकलून खोकलून पांढरी फटक झालेली आई
कशासाठी आठवायचं हे
नस्ती कटकट साली
चहा घेऊ मस्तपैकी
चला
चहाची ही सवय
पयल्यापासूनची
पहाटे चारला उठवणारे बाबा
नदीवर संडासला सोबत येणारा भाऊ
आंघोळी साठी गरम पाणी तापवणारी बहीण
चहा करून देणारी आई
अभ्यास ऐकणार घर
ही आठवण काही जात नाही
चाला
फोन करतो त्यांना
आठवण आली
***
आधार
धबाधबा कोसळून
ढग करतात स्वतःला हलके
पृथ्वीचे हातपाय जडावतात
तरीही
ती सूर्याभोवती फेरे घालीत असते
चंद्र असतोच तिच्या मागमाग
वासरासारखा
चांदण्या उगवतात आकाशात...एकेक
तेव्हा लोक
निर्धास्तपणे घराबाहेर पडतात
हसण्यासारखंच आहे हे
करोडो किलोमीटर दूर असणाऱ्या चांदण्या
आधार बनतात
आणि लोक एकमेकाला पावलापावलावर
निरखून पाहतात ..
आजकाल
आधारकार्डचे निकष काय असावेत
यावर
आणखी ही प्रबोधन सत्र घेतले पाहिजे
नाहीतर मंगळावर जाण्या ऐवजी
आपण पुराणात पोचू
***
वाळवंट
वाऱ्याने दिशा बदलली कीतोंड वळवून बदलावं
त्या दिशेने जाणे सोपे असते म्हणून
आणि मग वारा थांबल्यावर
पाहावे अनोळख्या प्रदेशात स्वतःला
स्वतःवरच बंधने लादवून घेत असतांना
तिथे
दिवसभर अडगळीत व्याकुळ झालेले मच्छर
रात्री थरारून सोडतात
रात्रीच्या यौवनाच्या कविता गाणे नकोसे करतात
आता
पहाटेची आराधना करीत
दिवसाची पहावीत स्वप्ने
पहाटे त्यांना चांगलाच जोर चढतो
मच्छर बेडर होतात
थव्यथव्याने घोंगावत येतात
उजाडते
शांतता येते
बरे वाटू लागते
लागते चुटपुट
परतीची
वारा थांबलाय
लवकर निघालं पाहिजे
उलट दिशेला जाण्यास जास्त ताकद लागते
या ठिकाणी
स्वतःत हिरवेपण उगवू न देण्याच्या वाळवंटी वृत्तीला
कायमचे हद्दपार केले पाहिजे
म्हणजे
ही वेळ येणार नाही.
***
मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन
बावीस कलमांच संविधान लिहूनबुद्धधम्म राष्ट्र निर्माण केलंत
आमच्या सर्जन भूमीवर
हिंदू कोड बिलाने केली मातृपूजा
बहिष्कृत हितकारिणी सभेपासून
पेटवत ठेवला जागृतीचा विस्तव
आमच्या तरुण बळकट अस्सल मनगटातून
स्वतःच निर्मित केलेल्या तमाम
संघटना- कलाकृतींना
स्वतःच विसर्जीत करून, हे महान कलावंता
राष्ट्रास अर्पण करतांना
उत्साहाने फुलत होता
तनामनाचा रोम रोम
२६ नोव्हेंबर१९४९ रोजी
दिसतो तुमचा निर्मिती भाव
विश्वव्यापी शब्दा शब्दातून
सत्याग्रह-ग्रंथ-व्याख्यानांच्या
अविरत परिश्रमांतून
जात
राहिलात १४ ऑक्टोबर १९५६कडे
मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन
असा दृढ संकल्प जगा समक्ष करतांना
भारतिय जनमानसाचे असखलीत प्रारूप
दृश्यमान व्हावे संघटित रित्या म्हणून
संसदेला केले कार्यप्रवण
हेच असखलीत प्रारूप म्हणजे सत्य आहे
त्वचेवर माखलेला जातीधर्माचा फेविकॉल
परदेशात गेल्यावर कोणत्या गटारात जातो वाहून..!!
उधवस्त केलेत प्रश्नबारुदीने
इथल्या अखंड भासणाऱ्या निसमताजन्य चिऱ्यांना..
दर्जाची व संधीची समानता
जोगवा मागून मिळत नसते
बाबासाहेब..!!
हे ज्यांना समजले ते झाले राज्यकर्ते
आमच्या घराच्या भिंतींवरची अक्षर
फक्त वाचण्यापूरते..
***
काषाय सृष्टी
ह्या संपूर्ण सृष्टीतून
विहरत असणारा काषाय रंग
लपत नाही ...उजेड असो की अंधार
नजर जाईल तिथे तोच असतो
टवटवीत प्रफुल्लतेने ओतप्रोत भरलेला
पावसाचे थेंब धारा होऊन बागडतात त्यातून
आणि भर उन्हातही तो मुक्तपणे वाटत असतो
आपले हास्य
पाहणाऱ्या प्रत्येक दर्शकाला
थंडीच्या दिवसात घोडनदीच्या किनाऱ्यावरून
अजिंठ्याच्या लेण्यांतील स्मित अनुभवणाऱ्या
गुबगुबीत ,ठुसक्या, ऊंच -ठेंगण्या,
लाल पिवळया काळ्या पांढऱ्या
वर्णवान आणि वर्णहीन पाखरांसाठी...!
नागपूरच्या चबूतऱ्यावरून
सांचीच्या प्रवेशद्वारावर नजर ठेवणाऱ्या
हे महान चित्रकारा
तुझ्या कुंचल्यातून स्त्रवणारा हा काषायरंग
अजूनही आमच्या देहमनास का व्यापत नाही?
आमचे सांसदीय निर्णय
आणि
सामाजिक चालीरीतीतली
काषाय सृष्टी पुन्हा उगवली पाहिजे
या आर्त अपेक्षेत आहे
विश्व प्रिझम.
***
माझं गाव
सुंदर विहार असेलदेवदत्तांचा अभाव असेल
लहान अजाण बालकांसाठी
एक सुनियोजीत शाळा असेल
मला गेलंच पाहिजे
शाळेला घर बनवण्यासाठी
शाळेतल्या प्रत्येक बालकात आंबेडकर कोरण्यासाठी
मुलांच्या डोक्यावरचं ओझं काढण्यासाठी
त्यांच्या अंगावरच्या चिंध्या
शिवण्या साठी
कोणत्याही चौकात बहिणींना
बिनधोक उभं राहता यावं यासाठी
चौका चौकात पंचरंगी झंडा
असेल
शस्राशिवाय माझं नगर निर्भय असेल
दगडासाठी माणसं नाहीत संपणार
छपरातून गळणाऱ्या चांदण्यातही
पैदा करतील
विटेनेही लोणी व्हावे असे जवाब.
असा असेल माझ्या गावाचा रुबाब.
***
एवं मे सुतं...
सुप्पीय उगवतो माझ्या तळहातातून
रस्त्याच्या कडेला पिवळणाऱ्या
गवताच्या पात्यासारखा
येतात पात्यामागून पाते
डोलतात स्वतंत्रतेने
कुठल्याही संस्काराविना देतात आवाज
ए छोरा
वर्रा
बाटी खाई छ काई
छे नी
मोबाईल र गेम खेळेर बाद”
-म्हणता म्हणता
या महाभयंकर जाणीव जंगलातून
वाटचाल करता करता
विंडोज चा जमाना मागे पडला
नवनवीन ब्राऊजर्स येताहेत
मच्छर भगाव च्या डबी सारखे
तपस्सु-भल्लीक चे ताकाचे लाडू
बिडीओ च्या ऑफीसातच लीक होताहेत
एक मूल एक झाड
या नात्यातून ऐकू येतेय
एक टांगी डफड
आणि थेंबभरही पाणी न साठवू शकणाऱ्या
खडकांचे बेट
कुणीही अडवू शकत नाही त्याचं
पर्यटन स्थळ होणं.
या पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात...
जाऊ द्या
घ्या टप्पर भरून
चला हाग्याले
येतायेता मटण घ्यून यू त्यातनी
काळा माचीस
पेटवा चिलम
पा यखांदी वाजंत्र्याची आडर भेट्टे का
ज्यमी तो ज्यमी नईं तो अब्दुल गनी।।
आपून सोतंत्र हाव
त्या ओबामाले काय दोनच पोरी
डीश अँटेना झेल्ते वरच्या वरी
बिग बँग सापडो का गॉड पार्टीकल
सकाळ झाली का साठचा लाईट
बन करा लागत
आणखी कानांतल्या कानात
भराडींच्या किंगऱ्या
बाळ साठेंच व्हायोलीन कसब
इमॅजिन करत राहतात
आणि काढू पाहतात उघडया डोळ्यांच्या
बुद्धाचे चित्र, तेही
या आसमंताचे कागद
रंगत-रांगत जातात
च्या प्याया कपबशी न्हाई
पावना रावळा आला
त टाकाया सतरंजी न्हाई
कोण पाहत आपल्याला या जंगल गावात .!
शेहेरातले स्टो दुरुस्त करता करता
दलाई लामा भेटतु कवा कवा
थकलेला
(सत्ते फुडं शानपन चालायचं न्हाय)
मंग कोंबडी नि शिशी तून
मेल पाटीवतो त्याला जनू
आणि म्हणत ऱ्हातो
माझ्यातल्या सुप्पीयाला
अमर्त्य सेनची साथ
मुबारक हुसेनचे बचत गट
कधीचेच झाले वारदात
अन ऊते अपणो जोरेवार केत हे
मोरी लुगाई के बाप के घरे
कुछ बाकी नैया
का करे
चमडी पकाऊ को टाको भी चले गयो ना
मोरी मतारी के टी बी के
कोन पेसा लगांत हे
तो के का ss हे
बी पी एल के गेहूं खावं
अन मामाकी बकरी चराव
अपणो जंबुरो ह्येच
इते कछु नैया बाबा
वू देख
बोधितरु बुलावत हे
चल ऊते
लावा दिवा
घ्या हातात हात
हलवा डोकं
उचला खोक
सारे आकाश भरून जाऊ द्या
रक्त वर्णाने
होऊ द्या स्वनांची बरसात
“एवं मे सुतं ,एकं समयं भगवा.”
***
•हा अखंड तागा
ज्या भग्नमग्न अवस्थेस
माणसे कवितेपाशी येऊन थांबल्यासारखे करतात
खरे तर तो विद्रोहबिंदू
याच विश्वजालाचे प्रातिनिधिक आम्लचीत्र असते
हा गुह्यगर्भ
ज्या भावरज्जुंतून
प्रवास करतो
त्याच्या गाठी दिसत नाहीत .....
त्या नसतातच
हा अखंड तागा
कुणीही बनवला नाही
कुणी नष्ट करावा यासाठी
तो बनला नाही .
***
उडवला पाहिजे अचूक
माणसाला जगण्यासाठी जे जे करावे लागते
ते सर्व करता आले पाहिजे.
खाणे.
पिणे.
झोपणे.
जागणे.
ऊभे राहणे.
प्रसंगी ,होता आले पाहिजे क्रूरकर्मा .
नसता ,
त्याला सांगाव्या लागू नयेत पाण्याच्या गोष्टी .
आपल्या स्वत्वाला तडजोडीची भीक मागावी,
अशी होऊ नये परिस्थिती निर्माण,
व्यवस्थेच्या पैश्या-अडक्याच्या आकृतीबंधात.
सुखाचे कुंचले माळरानावर पेरणाऱ्यांनी हट्टी असले पाहिजे.
ऊडवला पाहिजे अचूक
मस्तवालपणे उडणाऱ्या पक्षाचा उजवा डोळा.
काय करावं माणसे
भुकेला घाबरतात.
***
•आतला किडा
पायातला काटा काढतांना
लहानपणी तू
निंबाच्या झाडाला जीभ दाखवाल्लावायची
काटा काढला की
त्यावर मिठाचा बारीक खडा ठेऊन चटका द्यायचीस
मग चालू लागलो
"पण तू चळवळीसाठी घरदार सोडलस
तुझ्या बापा सारख
का केलंस असं
"
काय करू आई
वारूळ कितीही खोदलं
तरी ते वर येतच
आतला किडाच तसा प्रभावी असतो
***
• रस्ता परत परत नवा होतो
रस्ता परत परत नवा होतो
मोसम परत्वे
तो त्याचा स्वभावच असतो
रस्त्याच्या दुतर्फा पांढरे ठिपके
चिकटवल्या सारखे
गाजर गवताचे मोहक फुलं !
थेट डांबरा पर्यंत
शेत मालकाने
ठोकलेली
कुपाची काटी ..!
झुटीनची फुलं
सावरची फुलं
फोटू
गाडूम्ने
आरं
चारं
बोरं
करुटले
शोधायला निघालेली आजी
आजीच्या हातात लांब काठी
सूर्य उगवता उगवता
आजी घराकडे परत्ते
तो आजीचा स्वभावच आहे
स्वभावाला औषध नसते
या डिजिटलायझेशनच्या काळातही
पोटाचा ट्रान्सप्लांट सापडला नसते
***
•
जयभीम म्हटलं की
शहरात
कॉमनवॉल च्या आरपार कोणताच आवाज
इकडून तिकडे जात नाही
घरं चिकटून असतात
शब्दांच चिटपाखरूही फिरकत नाही
म्हणजे तुम्ही माणसात नाही राहत
ताठ डोळे
अकडलेली मान
वाहणारी धास्ती
भरल्या दिवसांचे ओझे
..सदानकदा
पण जिवंतपणा असतो कुठे
फक्त जयभीम म्हटलं रे म्हटलं
की कॉलनीत वार उधाण सुटते..
ते घरा घरात घुसते
खिडक्यांची उघड झाप होते
पडदे फडफडतात
आतबाहेर केल्याने धूळ उडते
आतला कचरा बाहेर टाकण्याची धडपड वाढते
लेकरं बाकर वात्तरतात
आणि हे थांबतच नाही
***
• गुर्जी सांभाळून जा
“....घरी काय हाय
शाळेत तरी
मातीची जमीन नाई फरशी हाय
कुडाच्या भिंती नाहीत विटा सिमेंट च्या हायेत
झावळ्यांच छप्पर नाही टीन पत्रे हायेत
आणखी दररोज दुपारी भात मिळतो
भाजी मिळते
कधीकधी बिस्किटे मिळतात
छान छान पुस्तके
बसायला पट्ट्या
ड्रेस
फक्त गुरुजी सांगतात तसं
लिवायच
वाचायचं
खेळायचं
गाणी म्हणायची
“ गुरुजी ,इतक्या लवकर
घरी जाऊ नका ना
थांबा ना
गमते आमाला ..
की सांगू माझ्या बाबाला ..”
“बाळांनो
आभाळ चारीकडून भरून आलंय
फुरफुरी सुरु झालीय
एकदा हे जोरात सुरु झालं की
आमच्या गाड्या काढता येणार नाहीत
या खेड्यांतून आम्हीही अडकून पडू
घरी आमची चीलीपाली आहेत वाट पाहत
“गुर्जी सांभाळून जा
नाही सांगत बाबाला
"
***
•सारे शोधात आहेत
बहुतेक प्रत्येकाचेच केस पांढरे होतात
कुणी लपवतात त्यांना कलप लाऊन
कुणी जपतात जशेच्या तसे
ते जिगरबाज असतात
भीत नाहीत स्वतःच्या रुपाला
मैदानात लोक असतात सारीकडे विखुरलेले
ढेऱ्या सुटलेले किंवा सडपातळ
बाईकवाले अथवा दरवर्षी बाईक बदलणारे
इन करणारे अथवा कडक इस्त्रीवाले
गॉगल लावणारे अथवा अंगठ्या गोफ घालणारे
सोबत कुणाला तरी घेऊन अथवा टोळक्याने फिरणारे
हॉटेलिंग करणारे अथवा आयुर्वेदिक चूर्ण घेणारे
बायका असणारे अथवा मोठमोठ्याने हसणारे
सारे चेहरे
शोधात आहेत
दारोदार-गावोगावी-शहरोशहरी
मृगकस्तुरीच्या वासाने धूंद होऊन
****
•सभा
वेळ जाता जात नाही
स्वस्त-महाग हॉटेलवरच्या गर्द्या वाढलेल्या
म्लान चेहरे टवटवलेले
भव्य स्टेडियमवर
होणाऱ्या सभेला अजूनही बराच वेळ आहे
आजूबाजूची खेड्यापाड्यातली तरुणाई
गोळा झालेली
खाऊन खिलवून मोकळी झालेली
मग आता काय
ही sssss गर्दी
स्टेशन रोड पॅक
स्टेडीयम वर घोळकेच्या घोळके
इकडून तिकडे भिरभिरताहेत
सभा सुरु होण्याची वाट पाहत आहेत
वेळ घालवताहेत
पुस्तकांच्या दुकानाच्या रांगेत
घुसलेलं रेवड्या –फुटाण्याच दुकान
त्याच्या बाजूला उदबत्तीच दुकान
पोंगे वाजतात
घंट्या वाजतात
कशाकशाच्या...
स्टेजवरून लोकगायकांची
गायने सुरु आहेत ....नम्बराप्रमाणे
वक्त्यांची भाषणे झाली
की
तसाही
रात्रभर त्यांचाच जागर
हां
प्रारंभापासून चालत आलेली ही जबाबदारी
हळूच आपल्या सतरंज्या लांबवायच्या
पायही लांबवायचे
गाणेही ऐकायचे
मधेच उठून
एखाद्या स्वस्त पुलाव देणाऱ्या गाडीवर चक्कर टाकून यायची
लघवीही करून घ्यायची
बरं थोडं थोडक्यात नाही तर
गावं च्या गावं येतात
वाहणे घेऊन येतात
ट्रक्टर , मेटॅडोर, जीपा , मिनीडोर,ट्रक ,टूव्हीलर्सची
तोबा गर्दी-
लोक येतात
खातात पितात ऐकतात झोपतात
मारे गप्पा ठोकतात
काहीतरी सोबत घेऊन जातात
कुणाला तरी सोबत देऊन जातात
पुढच्या वर्षीच्या सभेची वाट पाहतात.
***
•रबराची आमटी
जेव्हा एखाद्या खांद्यावर
विश्वासाने आपण हात ठेवतो
तेव्हा त्या हाताने ओतायची असते
सोयरपणाची ऊब
अंगठा आणि बोटांच्या सहाय्याने
हलकेच दाबून
डोळ्यांनीच प्यायचा असतो डोळ्यातल्या
आपलेपणाचा घरंदाजपणा
दुसऱ्या हाताने आग्रहाने ओढत नेऊन
हॉटेल च्या बाहेरच्या बाकड्यावर बसून
घ्यायचा असतो अर्धा-अर्धा चहा
तेव्हा कुठे डोक्यातली एकटेपणाची ठसठस
शांतवत जाते
आणि जीभ
रबराची आमटी खाण्यास उतावीळ होते
गोष्टी करता करता मग
आपल्याही पाठीवर हलकेच
एक हक्काची थाप येते
आपल्याही पाठीवर मग
हक्काची थाप येते
***
• याची चिंता आताच कशाला ..?
नजर जाईल तेथ पर्यंत
हिरवळच आहे
चारीही दिशांकडे
मग फुले उगवली नाहीत
याची चिंता आताच कशाला?
चालतांना झाडांची हाडं
चुरगळणार नाहीत
याची दक्षता घेतांना
हळुवारपणे उचललेला पाय
आपलाच असतो
मग या वर्षीच्या दुष्काळाची चिंता
आताच कशाला?
ह्याच कारण तुम्हाला कळायचं नाही बाबा
***
•शिक्षित लोकांची पिढी
गुहेच्या त्या टोकावर
बसला आहे मैत्रेय बोधिसत्व
जन्म घेण्यासाठी आसुसतोय
झोपडपट्ट्या-वार्डातल्या-खेड्या-पाड्या-तान्ड्यातल्या
आसवांच्या थेंबाथेंबातून
“हा गुह्य प्रवास
संपव रे बापा
जुळव लवकर हा महासागरासारखा संघ
ह्या शिक्षित लोकांची पिढी
तुझ्यासाठीच बाबासाहेबांनी तयार करून ठेवली आहे
मैत्रेय बोधिसत्व
तुमच्या माझ्या मनातला
घरातला
ऑफीसातला
पक्षातला
पाहतोय वाट
जन्म घेण्याची
****
•तुम्ही बरे असता तर
उकरडा मास्तरांच्या मृत्यू नंतर
एका कवीने
कविता लिहिली त्यात
त्यांच्या मंत्र तंत्राचाही उल्लेख केला
झोपडपट्टीतल घर
आणि
सासुरवाडीत राहून केलेल्या प्रगतीचा
त्यात समावेश होता .
प्रेत यात्रेत त्यांच्या क्षेत्रातले
भुवयांच्या मधोमध कुंकवाचा टिळा लावलेले
काही पुढारीही होते
हळदीने मळवट भरलेले
काही चेले चपाटे ...
“ उकरडा मास्तर ...!
एखादी गोळी मिळाली असती वेळेवर
तर तुमचा सतत थरथरणारा देह आजारमुक्त झाला असता
नसा झाल्या असत्या मोकळ्या
तुम्ही झाला असता स्थीर
शांतामावशीची तब्बेतही सुधारली असती
तुम्ही बरे असता तर
साप-विंचवाचा उतारा देण्यास सज्ज असता
आता मंत्र-तंत्र राख झाले आहेत”
***
•पाण्याचा गंध मस्तीभरा
त्याच शेवाळलेल्या रांजणातल पाणी प्यावं
आणि त्याच झाडाखाली येऊन उभ राहावं
पुन्हा तहान लागीस्तोवर
पिरीयड चे टोल पडत राहतात
एकामागून एक
नेहेमीचच हे
दिवस उगवला की तारखेची चिट्ठी फाडून टाकावी त्वेषाने
तरीही घेत राहावा
पाण्याचा गंध मस्तीभरा
नदीच्या गोलपेंडी डोहाची आठवण करून देणारा
शोषित रहावा ..दिवस भर
आणि
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा जय जयकार करावा.
***
•या काट्या कुट्यांच्या रानात
आजूबाजूला काट्या कुट्यांच रान
पसरलेलं
हिंस्त्र पशुंचा वावर
सरपटणारे प्राणी फुसफुसत असणारे
कधी लाल तर कधी पिवळा
तर कधी आणखी कोणता रंग
धारण करणारे शॅमेलिऑन ऐन वेळी
डोके वर काढणारे
बाबासाहेब किती खरचटला असाल
या सगळ्या जीवघेण्या विळख्यात
जाऊदे ते आता तुझं सांग
तू कोणत्या पदावर आहेस?
हॅ हॅहॅ हॅ जाऊद्या मला सरम
लागते...
****
...हा संगर इथपर्यंत आणण्याचा
आम्ही घडवला इतिहास
हा संगर इथपर्यंत आणण्याचा
तरीही
आमच्याच विरोधात जेव्हा
तो
उभा ठाकला
तेव्हा
आमच्या
डोळ्यातून पडलेल्या आसवातले
दोन चार थेंब
याच भूमीत
पडले रुजले अंकुरले
झाड झालं त्याचं
त्याच्या
अंगाखांद्यावर –फांद्यावर
खेळता-बागडता
त्याची फळ चाखता
आणि बेंबीच्या देठापासून जाल्लोषता
हे झाड आमचे आहे
हे झाड आमचे आहे
बरं आहे
***
•मोल
घरातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला मोल येणार नाही
असा निर्णय घेतला
आता पर्यंत सगळेच प्रयत्न केले.
शिक्षणाच्या वकुबानुसार
एकही डिपार्टमेंट
अर्ज केल्याविना नाही सोडले.
.......पण जमलेच नाही
आणि जमले नाही म्हणून...
थकलो नाही
आताही थकलेलो नाही
नाउमेद अजिबात नाही
विश्वास आहे स्वतःवर
बुद्धधम्म ओठात घेऊन , आता
शहराच्या रस्त्या रस्त्यात फिरत असतो
आणि
उरलेल्या वेळात शिवायला आलेले
दोन-तीन कपडे शिवत बसतो
न डगमगता
प्रत्येकाच्या डोळ्यात पाहत
माणसाच माणूसपण शोधत असतो
हळूहळू मोठ होत गेलं आकाशाचं प्रतल
“शिकावं तरी किती ?”
आश्चर्यच
या शहराने आपल्याला गिळंकृत केल्याच वैषम्यही वाटायचं
“........पण माणूसच असतो माणसांच्या अंधारातला
एकमेव प्रकाशकिरण
तो शोधावा लागतो”
एकदा चौकातल्या साताठ पोरांसमोरांना हे त्वेषाने
तेव्हा
सर्जन चक्षूंच्या लक्षात आलं
घरातून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला मोल नाही
***
•
काही उमटतच नाही
माझ्यापाठीमागे उभा आहे घोळका
माझ्या पावलांप्रमाणे चालतो
माझ्या नजरेने पाहतो
गुंतून गेलो आहे त्यांच्यात
घोळका होतो थवा
मला टोचा मारतो
सर्वांग गोंदू पाहतो
टोचा मारत राहतो
काही उमटतच नाही
रक्त निघतच नाही
नंतर! घोळका चिडतो
आणि
निमुटपणे चालू लागतो
***
•बाप
माय असते
वडील असतात
हयातभर आपल्याला भेटत असणारा
प्रत्येकजण जो असतो आपला
गुरु-
विराजमान असतात त्याच्यात
क्रांतिसूर्यान दिलेल्या ऊर्जेतील
हाती येतील तेवढी किरण
जोडत असतो तो
लावत असतो सुसंगती
क्रम
करतो उजळणी वारंवार
त्या त्या वेळी त्याच
रडण नाही दिसत
हसण नाही दिसत
दमण नाही दिसत
आपल्याला जे म्हणायच असत
ते त्यानेच ठरवलेल असत
आपण जे घडणार असतो
ते मडक त्याचच असत
रचत असतो तो एकेक किरण
स्वत:भोवती.... कुटुंबाभोवती..
ढासळतो इमला
आणि तो रचीत जातो तरीही
एकावर एक एकावर एक
हे बाप लोक
हरत नाहीत
कधीच हरत नसतात
त्यांच्या खिजगणतीतही नसते अपयश
त्यांनी काय काय केल
याचा पाढा पाठ होत नाही
काssही केल्या
मित्र नसतो
शत्रू नसतो
असतो एक मूल्यमापक
अमर्याद परिमाणांचा
कधीच शांत न होणारा
उत्तरोत्तर विस्तारणारा
बापपण मुलाच्या अंगात भीनाव
हे त्याच लक्ष्य
शेवटपर्यंत साध्य होत नाही
त्याच्या ओठात एक गूढ स्मीत
तरळत राहते
कसल?
हे अखेर पर्यंत कळत नाही
तो असा असतो
त्याचा स्वत:चा स्वतःवरच असतो पहारा..
****
•इट्स अवर टाइम
झोपू नका
आपल्याला एकमेकांना जागतं ठेवायचं आहे
आपण जागे असलो तर लक्षात आणून देऊ की ,
आपल्यासाठी निर्माण केलेल्या माऱ्याच्या जागांवर
कसे वळवळणारे किडे बसवलेत त्यांनी
संड खातात. ....भदभद हसतात.
आपला खरा शत्रू ओळखा
रडून उपयोग नाही
लढाई शिवाय जीवन नाही
आपल्याच उज्वल सभ्यतेला हृदयापासून कवटाळत आहेत ते. ..
आणि आपल्यात आपलीच घृणा निर्माण करून
दलितावस्थेकडे जाण्याचा मार्ग करीत आहेत प्रशस्त
आता या टायमालाच तर आपली खरी परिक्षा आहे
स्वतःला ढळू न देण्याची आपल्या स्वतःच्या सभ्यते पासून
रागलोभद्वेषमत्सराला बांधून ठेवणारी काट्याच्या अणीवर
आपली जमात
अरे! आपणच हाताला हात जोडून युनिवर्सल
पीत वस्त्राचं निर्माण केलय.
लक्षात ठेवा
जगात जे जे काही मंगल आहे
ते सर्व आपलेच अनाकुल आहे
आपल्याच मंगलोत्तम विचारांना
ते त्यांच्या रानटी भाषेत मांडतील
तेव्हा गडबडून जाऊ नका
फोलपट हळूवार उचकटलं की
हलकेच तुमच्या कानात मंगल स्वर येतील
बुद्धं सरणं गच्छामि
चिंचेच्या गर्भारपणाच्या दांभिक चिंध्या
तिच्याच कृतक हास्यातून गळून पडू द्या
शांत रहा
रबराची आमटी खा ओरपून ओरपून
इट्स अवर टाइम
***
•ओळखीसाठी
पोरगी पाहायला जाण्याच्या निमित्तानेतुमच्या सोबत हिंडतो
पोरगी तुमच्याकडे मिळाली नसती का?
मिळाली असती पण शहरातली
ते बरं आहे ना,
आम्ही तर कंटाळलो या गावा-गवात्रांना.
तसं नाही भाऊ,
होता होईस्तर आपल्या भागातलीच पाहू
त्या निमित्तानं वारंवार येणं होईल
आपलीही भेट होत जाईल
आयुष्यभर शहरात राहीलो
जाम पैसा कमावला
मुलं चांगली शिकवली
मोठ्या हुद्द्यावर लावली
मग आता काय झालं
अहो ह्या धामधूमीत गावापासून दुरावलो,
माणसांची
नातलगांची साधी ओळखही राहीली नाही,
या निमित्तानं
आजूबाजूच्या खेड्यापाड्यात फिरायला मिळते
लोकांची ओळख होते.
चांगलं हाय मंग या लोकांसाठी काय आणलं
कारे भिकारचोटा ...
****
•
फक्त एकदाच
सगळ्यात जास्त विटंबनातुमच्या पुतळ्याची होते.
माझ्यानंतर तुमचा क्रमांक लागतो बरं, महाराज.
आहे माझ्या लक्षात ते
पण एक क्रमांक तुम्हीच.
असू द्या पण दोन क्रमांक आहाच ना तुम्ही.
अरे ओ भांडणकर्ती जमात
तो पाहा येऊन राहला विटंबना करायला
काई नाही-
फक्त एकदाच याच्या अंगावर रॉकेल टाकून
उभाच जाळू द्या
दुसरा तयार होईन तं शर्यत बांधतो.
हम् म्हणजे परत सतराव्या शतकातला गनिमी कावा
परत परत!!
•••
• दोन्ही बाजूंच्या सैन्याची रसद
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा नद्या जोडणी प्रकल्प
चौपदरी रस्त्यांच्या डिव्हायडरवरून वाहत येतो
पदव्या वाटणाऱ्या विद्यापीठांच्या सांद्र धुरातून
संसदेच्या आराखड्यांचे एलीव्हेशन्स,
प्लँन्स ...दररोजच आकाशवाणी आणि दूरदर्शन वरून ऐकतो -पाहतो आपण
आपण प्रत्यक्ष पाहू शकतो
देवदत्ताचा पुनर्जन्म
चिंचेचे गर्भारपण
नालंदा विद्यापीठातील पुस्तकांच्या धुमसत्या राशी
खांद्यापासून आपले हात शिवशिवतात
पाय कदम टाकण्याच्या स्थीतीत
डोळे उत्सूकतात त्वेषाने
अरे!!
जिथे आपणच युद्धभूमी झालेलो आहोत
तेव्हा आता
आपल्या लढण्याला अर्थच काय उरतो......
आणि अर्थच जर नसेल तर जगून फायदाच काय
तरीही
आपला जीवंतपणा सिद्ध करायचाच असेल तर
दोन्ही बाजूंच्या सैन्याची रसद कापण्याची धमक ठेवलीच पाहिजे
अन् उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
आवळलेल्या मुठी सम्यक मार्गात परिणत केल्या पाहिजेत
अन्यथा
रक्ताचे पाट वाहू नयेत म्हणून
आपल्याला स्वत:चचं रक्त प्यावं लागेल.
रक्ताचे पाट वाहू नयेत म्हणून
रक्ताचे पाट वाहू नयेत म्हणून
***
•पाण्यात राहून माशाशी वैर !
घंटोका काम मिटोंमे करणारा हार्वेस्टर आणला
पंधरा यक्कर सोयाबीन झटक्यात काढलं.
काढू द्यानां तुम्हाला काय त्याचं ?
तसं नाही म्हणत मी
त्या ट्रॉलीत पाहा
मालही आहे-कचरा पाहा किती आहे.
एक दिवस उशीरा नेलं असतं बाजारात
साफसूफ करून तर
हजार रूपयांनी भाव वाढला असता,
पण यानले घाईच फार.
अहो गुरूजी,
तुम्ही अशी बोलता बोलता चुळबुळ का करा लागले.
काय बोलता राव, कुठी हा.
हे म्हणजे
पाण्यात राहून माशाशी वैर !
***
•चळवळ चालली पाहिजे
अरे ए पोरा
'त्याचं' नाही 'यांचं' नाव अध्यक्ष म्हणून जाहीर कर.
पण दादा तुम्ही तर त्यांच नाव सांगीतल होत..!!
आँ! खरच!! माझं त काई लक्ष नाही बुवा.
असू दे
मी सांगतो तसं करा
अँडजस्ट करा हे नवं नाव
अरे चळवळ चालली पाहीजे ना आपली...
नाही का?
हो दादा
हँहँहःहहःहःहः
***
•चवदारवंश
होय मी माझ्या हयातभर असाच राहीन जसा
आज दिसतो आहे दिसत राहीन अगदी तसा
तू बहाल केलेल्या विल पावरच्या राशी
मी अश्वारूढ टाच मारीत दौडत या विश्वाशी
भांडत ठेवलाय काळाशार रस्ता पांढऱ्या आकाशासकट
मोठी झाडे गवतफुले बोरी बाभळी आपापल्या काट्यांसकट
घेऊन येतोय अवयव परिसर जाणिवांचे क्षेत्र
मी आणि माझा सबंध भवताल आठवतोय
आपला चवदारवंश...
***
•आई
आई फक्त आई असते
ती स्त्री किंवा पुरुष नसते
ती पहिला पाऊस बोटाने दाखवते तेव्हा
तो पाहणारे डोळे तिचेच असतात, आपले नसतात
तिने सांगितलेल्या सुंदर सुंदर गोष्टी ऐकणारे कानही तिचेच असतात.
तिची दुखणी तिचीच असतात
तिची मजूरी घरादाराची असते
रात्री दुरडीत उरलेला घास कुटका , जनावराला टाकण्यापूर्वीचा तिचा असतो
तरीही
आपल्या शिक्षणाच्या प्रारंभबिंदूचा पहिला आकार , तिनेच काढलेला असतो
आपण असतो
आई नावाच्या महासागरातला
एक इवलासा थेंब.
****
•सगळ्या फुलांचे चेहरे
सगळ्या फुलांचे चेहरे सारखेच असतात
आणि वेणीत माळलेले गजरेही
गंध-येतो
जातो-गावाशहरातल्या प्रत्येक गल्लीनगरातून
सारखाच विहरतो .
नकळत कळीचे रुपांतर फुलात होते
घरभर तिचा सुवास असतो
पण ती कुठेच नसते
कळ्यांचेच होतात गजरे
कळ्यांचेच गजरे होत राहतात
कळ्यांचे गजरे विहंगम असतात .
गजरा कधीच अदृश्य होत नाही
त्याची स्थित्यंतरे फक्त होत राहतात
जातक कथांसारखी
या जन्मातून त्या जन्मात
त्या जन्मातून या जन्मात
गजऱ्याचे चूर्ण करून दररोज रात्री घेणारे -
गजऱ्याचे भस्म कपाळावर मिरवणारे –
गजऱ्याचे अल्वार गजरेपण जपतात काही -
काहींसाठीच असतो गजरा
काहींसाठीच सजतो गजरा
•••
•फार काही नाही
हे माझ्या वर्तमाना
ऐकूनही तुला काहीच कसे करता येत नाही...!
सर दुपारूनबी आम्हाला शिकवायला येसान्ना ..
असे मधाळ शब्द ऐकून
छातीतून आलेले काही डोळ्यावाटे बाहेर पडतांना
घशातून गिळून टाकतो
कुणी पाहत तर नाही ना असा अंदाज घेत पटकन
खळाळून हसतो
ऑफिस कडे जातो अहवालाच्या फायलींमध्ये बुडवतो डोकं
करतो आकडेवारी बिनचूक
स्वच्छता करतो दिवसभर
राबवतो सगळ्या योजना
समायोजनाच्या टांगत्या तलवारीखाली फिरवतो मान
ईकडून तिकडे
समज गैरसमज निस्तारतो येताजाता
सहन करतो अपमान
कुत्र्याच्या भांडणाला फेकून मारत नाही दगड
हाड हाड म्हणतो
पोचतो वेळेच्या आधी नि दिवसाच्या चाकांचा बनतो एक आरा
उशिरा निघतो
तरीही सगळीच मुलं का बरं होत नाहीत हुशार
का होतो अध्यापन शास्त्राचा मेंदू पसार
काय करावे की ज्याने मेंदूतला कचरा निघून जाईल
आणि शिक्षणाच्या अनिवार्यतेचे प्रारूप त्या ठिकाणी साकार होईल.
मला आश्चर्य वाटतं तुझ्या आंधळेपणाच.
••••
•पाऊस
पाऊस एक
पाऊस आला रे आला
की, आठवते घर
कावरा बावरा होतो परिसर
पाऊस गेला रे गेला
पाऊस धुंदीत
चायना वाल वर बसलेला कावळा
थेंबभर पाण्याच्या प्रतिक्षेत त्याचा तिबेटि डोळा
पाऊस रंगीत
***
•शस्त्र
मी शस्त्र होऊन आलो आहे तुमच्यासाठी
तपासून पाहा
वापरा हवे तसे
अडगळीत नका टाकू
पिंजऱ्यात ठेवलेल्या सिंहाचा काय भरवसा
कामी येईल किंवा नाही
याचा अंदाज नसतो .
घासत ठेवा
अधून मधून चालवत राहा
आणि आपल्या बोटातली ताकद मोजत चला
बघा
कितीही अत्याधुनिक युग असलं तरी
त्याला चालविणारे हात तरुण असले पाहिजेत
अन्यथा
चाप ओढावा नि बंदुकीचा दस्ता फुटावा
अशी गत झाली तर
कुणी कुणाच्या खांद्यावर डोके ठेऊन रडावे?
आणि हातात आलेल्या संधीचा नीट वापर करता
आला नाही म्हणून किती दिवस एक दुसऱ्याला
दुषणे देत उचंबळावे
आता कुणाची वाट पाहण्यात काही अर्थ नाही
आता आपणच शिकारी
आपली शिकार शोधण्यास निघालेच पाहिजे
•••
म्हणून....
...आपण भांडत नाही....
नाही डोकेफोड, रक्त सांडवत अमानुषपणे
नाहीत हाती सूऱ्या- मेलेल्या गुरांच्या शेपट्या
नाही ऐकत कुणाची शिरजोरी
आपण वाघासारखे डरकाळतो
आपण कोल्हेकूई नाही करत
पडत नाही नस्त्या भानगडीत
डोक्यावर गंगा
तोंडात खडीसाखरेचा खडा
आपण कधीच अंथरत नाही आपला , शब्दसडा
बेवारशी....
***
•मी आता नाही लढलो तर
मी आता नाही लढलो तर
माझ्या समाजासमोर तोंड दाखवायला जागा नाही राहणार
माझ्या तोंडावर थुंकतील ते
ते सहन केल्यापेक्षा मरण बर
अहो पण कशान काही झालं तर ..!!
काहीही होऊ दे , हो बाजूला
आणि त्यांनी तुम्हाला मारलं तर
असे कसे मारतील
मी काय हातात बांगड्या भरल्या का?
अहो पण राहू द्याना
झालं गेलं ते जा विसरून ..मिळेल गंगेला
विसरलो असतो, पण मला जिवंत जगायचं आहे..प्रेत म्हणून नाही तरंगायच..,
त्यांनी फेकून दिलेलं,
सडलेल
लाटेसोबत वाहत जाणार, वाऱ्याने ढकलल्या गत
सोड जाऊ दे मला
समाजात इज्जत राहिली पाहिजे
खरं आहे,
मी सुद्धा जिवंतच जगेन
तुमच्यासारखी
थांबा ,मी पण तुमच्या सोबत येते
पाहून घेऊ.
•••
- हीच ती वेळ आहे
जी आपल्या हातात आहे
परत हे असेच घडणार नाही
काळाचे नसते होत पुनर्भ्रमण
हा क्षण
पुढ्यात उभा ठाकलेला
उत्सूक
संवैधानिक लेण्यांचे निर्माण करवून घेण्यासाठी
आपल्या अधिकृत धम्मकरांद्वारेया नंतर भेट होणे कठीण आहे...
आत्ताच काय तो निर्णय घेतला पाहिजे
भविष्यातल्या बागेसाठी
जमीन नांगरून ठेवली पाहिजेआपल्याच अंगणात दुसऱ्यांची फुले
उमलतांना दिसतील
तेव्हा
स्वतःची चिता रचण्याचा प्रसंग
येणार नाही..
इतके झाले पाहिजे
मार मुक्तअशी अवस्था कष्टप्रद आहे
हे खरे आहे.
पण ज्यांनी ज्यांनी ते साध्य केले
तेते सगळे अर्हत झालेले सत्व
माणसेच आहेत
आजूबाजूला नजर उचलून पाहिलं पाहिजेआणि आपण
ज्या अवस्थेत आहोत
ती नेमकी अवस्था कोठून आली
या गुंताड्यात न पडता
आपण आपल्या स्वतःशीच केलेले
संवाद
संगीतबद्ध केले पाहिजेतआपणच आरंभलेले
हे तृष्णा मुक्तीचे अभियान
यशस्वी होईल
यात काहीच शंका नाही
कारण
ज्यांनी सुरवात केली त्यांचे पोचणे
हे एक निर्विवाद सत्य असतेसत्य हे आहे
की आपल्या डोळ्यांना भुलवत नाहीत
कोणतेच रंग…
आशाळभूत चित्रकार
पर्वतशिखरांकडे नजर ठेवून असतात
त्यांच्या
निमंत्रणांनी
उमटू दिला नाही आपण
डोळ्यात एकही ब्रशाचा फटकाराबोलल्या विना-
ऐकल्याबिगर
केला नाही कोणाचाच फैसलाजो काही दिसतोय प्रखर प्रकाश
तो आपलाच तर आहे ,जरा निरखून पाहिलं की कळतं..
या आसमंताच्या किनाऱ्यालाही हवं आहे आपल्याच नावाचं कूडतं.दान पारामिता पूर्ण करावी
कृपया, सही करून पावती घ्यावी………..
View comments
Loading
- शिस्तीचे जलसेशिस्तीचे जलसे
गातो, ठोकून गुडसे
कपाळावर माखतो
व्रण ,बोधिजैसेमखमली निळे
प्रतिबिंबांचे तळे
गल्लीला दिल्लीचे स्वप्न
आपल्या आंबेडकरी ताकदी मुळे
View comments
Loading
- मी तुझ्याहून जिद्दी आहे..मी तुझ्याहून जिद्दी आहे
नाही करत तडजोड
नको आधार
मीच माझा बुद्धविहार.असे नाही शक्य
की
सहीसलामत निसटावे एकेकट्याने..
नावा वरून
जेव्हा बेइज्जत केल्या जाते
प्रसंगी
खलास करण्यासाठीच केल्या जातात मारामाऱ्या
ठेवले जाते वंचीत
स्वतः हासील केलेल्या शब्दांपासून
तोडल्या जाते कुटुंबापासून
यात त्यात गोवून
वर्षोनुवर्षे
असे
आणि असेच खूप काही ...तेव्हा हवा असतो एक सम्यक आधार
नाही असे नाहीआधाराच्या उपकारापायी
खाली टाकलेली मान
कधीच नाही केली वरपण
हा एकीकडून नसतो
परस्परावलंबी असतो
याची तुलाही
गरज असतेच ना !कळत असूनही पापणी ओढत असशील
तर
तुझे कमलनयन तुलाच लखलाभ...
View comments
Loading
- चित्रांशी केलेली अगाध मैत्री..चित्रांशी केलेली अगाध मैत्री
देहा- मनाच्या विनय पिटकातून
किणकिणावी
झंकारत व्हावी लिपीबद्ध
समूहाचा मॅग्मा करावा अंकितठेवावी नोंद
येण्या-जाण्याची
लय - विलयाची
तटस्थपणेधारणांच्या सुकोमल तळाशी
उद्भवलेला मार
थकवावा.
सतत प्रयत्नांनी उपसून टाकावे.
नख लागू नये
निरागसपणे ओतलेल्या प्राणाला
जपावे
काठोकाठ भरलेल्या डोक्यावरच्या तेलाच्या भांड्यालाआकारावे ढगांसम प्रसन्न
आलय विज्ञानातून
व्यक्त व्हावे पावसासम निर्मळ काषायी
कॅनव्हास वर
बिंदूबिंदूतून दृश्यमान व्हावे
पाण्याच्या सत्याग्रहातूनजीव येते
बोलते
सांगते कहाण्या पिढीच्या
म्हणून
संविधानातून प्रकाशणारे चित्र पाहणे शिकावे.
येणाऱ्या पिढ्यांनाही ह्या रंगाचे आस्वादन शिकवावे.
View comments
Loading
- अणूला अणूअणूला अणू
जोडला
की
त्या दोघांचं नाव बदलतं
किती काळ असं राहायचं?
हे त्यांनी आपसात ठरवायचं असतंआता त्यांना विलग नाही होता येत
तो काळ कधीचाच मागे पडलेला असतो
आणखी काही येऊन मिळतात
आणखी ..........
महासागरात येऊन मिसळते अनेक नद्यांचे पाणी
आणि होते महासागरकाळाचे उत्सव
करावेत साजरे
धुंद व्हावे
उत्सवांशी व्हावे रममाण
त्यालाच म्हणतात निर्वाणआता प्रत्येक अणू
अंतर्बाह्य
ज्या रंगात रंगलेला दिसतो
तोच त्या मूलद्रव्याचा रंग
त्यालाही असते जाणिवेच अंग
View comments
Loading
- हा प्रवास
जिथून झाला सुरु
तो
दगडी चंद्र
विसरू देत नाही
की
मुक्कामाचा
शोध घेण्यासाठीच निघालो आपण .शेंगा फोडायला गेलं की
मालक तोंडाकडेच पाहायचा
ज्याचं तोंड हालल त्याच्या थोबाडात द्यायचा
निघतांना
बायांचे लुगड्यांचे
घोळ मोकळे करायला लावायचा
त्यात काहीच नसायचंमालक
गवताचे भारे
सोडून पाहायचा
त्यात काहीही नसे
तो भारा परत बांधावा लागे
तो पार ss विस्कटून जायचा
निंदाणाऱ्या, कापूस वेचणाऱ्या बायांना
तो
ढोर वळविल्या सारखा
सांजेस्तोर वळायचाआणि
बैलगाडीने निघून जायचाघरच्या इंधनासाठी कुणी
मागे राहिली,
गेली विसरून भान
उसरा पासरा पोचली जमीनदाराकडे
तर...!!
तर,
तिला मुकावं लागे स्वतःच्या कष्टाच्या मजुरीपासून
आणि तिला सांगितलं जाई
रात्रीला लक्ष्मी घरातून बाहेर पडू नये म्हणून..
तू आता सकाळी जा घेऊनही कष्टकरी (लक्ष्मी)
तोंड इवलस करून
परतायची
सपाट पुऱ्याकडेआठवतो ना
हा सुहाना सफर..!!
ह्या मुक्काम शोधाच्या प्रवासात..दगडी चंद्र
आपली सीमा सोडत नाही
आणि
हा प्रकाश आता परत फिरणे शक्य नाही
View comments
Loading
Loading
- नादमधुर प्रहराच्या मत्त गंधातनादमधुर प्रहराच्या मत्त गंधात
तुझे अलगद मिसळते आतूर विश्व
ज्या झाडाखालची वेचायची असतात फुले
त्या झाडातली ओढ मोहरते
तुझ्या पायरवानेनिरागस. बाळबोध. निसंस्कृत. निर्लेप. निरामय.
लोभस.
सखोल करुणेचे प्रारूप.
निसर्ग.
एकरूपत्व
प्रकाशाच्या तरंगांशी.
लांब आखूड कोणत्याही रुपात
अभिव्यक्त होणाऱ्या कणांशी.फुल
नाद
पायरव
गंध
अभिव्यक्ती
प्रतिक्षेच्या वसाहतीत ....
एक तीव्र आशा उबवत राहतातवरच्या ओठांवर आलेले घामाचे थेंब
दवबिंदू
जणू
गवताच्या हिरव्यागार पानावरचेएक विश्व जन्म घेते
कधीच न संपणारे.
View comments
Loading
- • पाण्यात राहून माशाशी वैर !घंटोका काम मिटोंमे करणारा हार्वेस्टर आणला
पंधरा यक्कर सोयाबीन झटक्यात काढलं.
काढू द्यानां तुम्हाला काय त्याचं ?
तसं नाही म्हणत मी
त्या ट्रॉलीत पाहा
मालही आहे-कचरा पाहा किती आहे.
एक दिवस उशीरा नेलं असतं बाजारात
साफसूफ करून तर
हजार रूपयांनी भाव वाढला असता,
पण यानले घाईच फार.
अहो गुरूजी,
तुम्ही अशी बोलता बोलता चुळबुळ का करा लागले.
काय बोलता राव, कुठी हा.
हे म्हणजे
पाण्यात राहून माशाशी वैर !
■
View comments
Loading
- तिथ पर्यंत जाऊन...तिथं पर्यंत जाऊन प्रत्यक्ष
पहिले की मग
विश्वास आल्याशिवाय राहणार नाही
की
खरे बोलणाऱ्या माणसाचे आपण
किंवा त्याने आपले
जे काय ऐकले होते
त्याच्याच तर नोंदी आहेत इथे...!संवाद साधल्यावर
कधीच नाही भय
पंचरंगी ध्वजाचा
सदैव होतो विजयआठवणींच्या निळ्या शांत प्रशांत सागरात पोहत राहावे
आणि
प्रहरावर प्रहर येतांना
जातांना
एक सततची मुग्धता आपल्या आत
तेवत असू द्यावीकोणत्याही प्रसंगी
बुद्धाच्या ओठांवरचे स्मीत ढळत नसते.
आकाशाला बाप, धरणीला माय तर
क्षितिजाला काय म्हणायचे असते???
View comments
Loading
- आपणच दिलेजळत्या राष्ट्राला
बारूद
माजलेल्या धर्माला
मस्ती
स्वैर वादाला
जामीन
कसायाला
सुरीदंगल करणाऱ्याला
संरक्षण
मानवाला नीच मानणारांना
सत्ता
टीका करणारांना
प्रोत्साहन
मिथ्या बोलणारांना
साथचोरी करणारांना
पासपोर्ट
कर्ज बुडवणारांना
माफी
बलात्काऱ्यांना
वकील
शिव्या देणारांना
धन्यवादमजुरांना
लाथा
बेघरांना
अपघाती मरण
विचारवंतांना
गोळी
अजाण बालकांना
कुपोषणआपणच दिले
View comments
Loading
- सोन्यातून निघतो जाळ
निळा पीत लाल श्वेत काषायी
पेटवीत निघतो काळ
हिरे माणके लपेटीत हृदयीतेजासव पृथ्वी आप वायूचे गाण
येई ऐकाया
एकत्व घेतसे जन्म
नव्याने पुन्हा सत्य सांगाया
View comments
Loading
- जिथे टांगले अंबरजिथे टांगले अंबर तिथली माती ही
ह्याच विवरा मधली सगळी नाती ही
भिरभिरणारे लुकलुकणारे ग्रह- तारे
मुकाट फिरती अजाण, सारी भरती हीमहापर्वताआडी एका जलाशयाची
रस्त्याखालून महासागरे ऊर्ध्व दिशांची
नाईलचे पाणी सिंधू नदीला जसे जोडते
तशीच यावी बोली आतून कुशलत्वाची
View comments
Loading
- घट्ट नदीचे पाणीघट्ट नदीचे पाणी त्यातून
ताट वाहते उलट दिशेने
विश्वासाची पर्वत शिखरे
उन्नत होती ह्या आशेनेजन्म घ्यायचा याच ठिकाणी
तर छापावे इथेच अंबर
इथल्या मातीमधले रंगीत
शिल्पित जावे गाव नि शहरउत्कटतेच्या पिकल्या वेळी
गच्च मूठ आवळून घ्यावी
सुटू न द्यावे बोट हातचे
याच भूमीची साक्ष करावीउलट्या सुलट्या जनावराला
पाहून घ्यावे- ना सोडावे
चुचकारून किंवा फुत्कारून
निर्वाणाचे बीज पेरावे
View comments
Loading
अश्रूंच्या पलीकडेहीअश्रूंच्या पलीकडेही
जे वसले आहे गाव
तिथलीच बोलीभाषा
तिथलाच हा उठावहृदयाच्या देठामध्ये
हे श्वास कोंडले सारे
जे दिसते चहुबाजूला
ते आहे सत्य अधुरेदूरवर कातळ पडलेला
विस्तीर्ण मनाच्या देही
जो प्रकाश दिसतो आहे
तो थेंब खरा विद्रोहीहा थेंब जगाचा डोळा
सत्यालाच भिडणारा
असत्यतेच्या थोबाडावर
सन्नकण लगावणारासंजय डोंगरे 9420704580
View comments
Loading
- चुकाच झाल्या साऱ्या आधीचुकाच झाल्या साऱ्या आधी
असे असे ते हवे आणखी
ह्या द्वंद्वाला ठोकर मारून
वर्तमान तळहाती घ्यावाजसे घडवावे तसेच घडते
उत्तर असते प्रश्नाभवती
सहस्त्रबाहू मार अडविता
टिचकी मारुनिया टाळावा
View comments
Loadin
- झाडे हलतात... हलतात
थकून येऊन बसतात
तरंगत्या फुलांवर..
अनित्यत्वाचे झोके घेतात
गोष्टी करतात
बोलतातफुलांची फळे
फळांच्या फलनोत्सुक बियांची
पाहतात वाटझाडे परत जन्म घेतात
View comments
LoadPages
- तिच्याच साठीपक्षीही येतील मागून
दाण्याच्या पाठोपाठ
बांधून निघावे पक्के
वाऱ्याला काठोकाठदिसेल अथवा नाही
तिला हे यातील काही
सरेल धुळीचा अंमल
ही नाग नदीची ग्वाहीहे तिच्याच साठी सारे
शृंगार वंदने मधले
संसद ओवाळीत आहे
संविधान डोळ्यामधलेवेगाला दावण नसते
अंगभूत असतो पान्हा
कोंबाच्या शेंड्यामधला
कोमेजत नसतो बाणा
View comments
-
- वाऱ्याच्या झुळुकीवरवाऱ्याच्या झुळुकीवर
काय लिहावे
आणि
लिहिल्या नंतर
ते
झाडांनी कसे वाचावेदृष्टी संकल्प
निर्धोक पणे कळावा
वाचा कर्म
सहज हुंकारावे
आजीविका व्यायाम
सातत्याने आकळावे
स्मृती समाधीतले सम्यकत्व
स्पष्टपणे नोंदवावेक्षितिज रंगवता रंगवता
मस्तकाचे विहारणे मुक्त जाते होत
पृथ्वीही सैलसर स्थिरावू देते ज्योतएक हलकीशी गार फुंकर
किती देते स्वैर वावर
View comments
Loading
- वाऱ्याच्या झुळुकीवरवाऱ्याच्या झुळुकीवर
काय लिहावे
आणि
लिहिल्या नंतर
ते
झाडांनी कसे वाचावेदृष्टी संकल्प
निर्धोक पणे कळावा
वाचा कर्म
सहज हुंकारावे
आजीविका व्यायाम
सातत्याने आकळावे
स्मृती समाधीतले सम्यकत्व
स्पष्टपणे नोंदवावेक्षितिज रंगवता रंगवता
मस्तकाचे विहारणे मुक्त जाते होत
पृथ्वीही सैलसर स्थिरावू देते ज्योतएक हलकीशी गार फुंकर
किती देते स्वैर वावर
View comments
Loading
- उणे असू द्याउणे असू द्या
सुने असू द्या
उपाय आहे
फक्त हसू द्याउभ्या जगाला
हसवायाला
आलो आहे
क्षणाक्षणालाआपण सारे
नितळ हासरे
फुलू फळु द्या
मूक लेकरेअंतरातली
देहावरली
एकच आहे
करणी ,बोली
View comments
Loading
- होय किनाराहोय किनारा
खरा सहारा
लाटेआडी
विसावणारापाठी येतसे
गर्द लालसे
गर्भ मुलायम
हवे हवेसेउंचावरही
मातीवरही
तसेच आहे
लाटेवरहीतिथे यायचे
उडी घ्यायचे
पायाखाली
हसावयाचेनाही तृप्तता
आणि मुक्तता
तव भेटीची
आस, आर्तता
View comments
- ज्या खुंटीला बांधून आहे स्वतःला ते तत्व असे
असे कसे जाईन विचारीत माहित नाही काही जसे
ज्या वेलीवर निर्भर होऊन झाड घेतसे खुशाल निद्रा
त्या झाडाने त्या वेलीला चिकटवलेला ना पापुद्रा !
नाव एकदा खुशाल घ्यावे झोकून द्यावी निमग्नता
असे एकदा दिमाखदारीने प्राशावी निवांतता
त्याच एक त्या जखमेमधली नाही निमाली आर्तता
कसे असावे कुठे कसावे कसे दिसावे पूर्णत्वा?
View comments
- हातास लागता हात-हातास लागता हात झडप घालण्या श्वापदे येता।
डोळ्याचा धरुनी नेम करावी चाल पाहावे देता घेता
आता न थांबणे इथे करावी कूच जावे रानात।
अन परत एकदा तिथे क्षितीजावरी रमावे गाण्यात
हे जगणे सारे असे हरविले सर्व भुकेच्या युद्धाने।
हे अंगुलीमाला थांब तुझेही भान भरुदे करुणेने।।
ह्या अशा पंगती स्मृती पेरती जन्म पुन्हा नात्यांचा।
नव्हतेच कुणीही कधी न झाला कधी जाळ प्रेमाचा।।
ना जन्माची कधी चौकशी ना मरणाची चिंता।
अशाच कोऱ्या रुक्ष कातळावरती रचला स्नेहच होता।।
जरा पाहता सर सर सर सर अंगावरती आला काटा।
भरून आल्या चेहऱ्यावरती करुणेच्या घनगंभीर लाटा।।
करुणेची ही अपार दौलत रंध्रामधुनी आज उगवली।
देहमनाच्या पार नेतसे शीलवत्ता ही एक सानुली।।
कुणी न व्हावे कुणा न व्यापून नाही कुणाच्या शिखरावरती।
कोण जिंकले कुणास जिंकून कुणास रचले कोणावरती।।View comments
Loading
Loading
Loading
Loading
अरिय ARIY
अरिय ARIY
- गच्च दाटून यावेगच्च दाटून यावे
ओहोटू नये
चंद्राच्या भलावणीला
वितळू नयेसरकण्याची भाबडेपणे
वाट कशाला
हे तुफान आता
राहो संगतीलाविसर पडला तर
खाज येईल
मोक्याची गाडी
निघून जाईलतुडुंब व्हावे ,व्हावे चिंब
विस्कटू नये
सोन्याची सुरी पोटात
खुपसून घेऊ नयेश्वास हा उच्छ्वास होणे
अटळ आहे
हाच क्षण राजगृह
उभारण्याचा आहे
View comments
Loading
- गच्च दाटून यावेगच्च दाटून यावे
ओहोटू नये
चंद्राच्या भलावणीला
वितळू नयेसरकण्याची भाबडेपणे
वाट कशाला
हे तुफान आता
राहो संगतीलाविसर पडला तर
खाज येईल
मोक्याची गाडी
निघून जाईलतुडुंब व्हावे ,व्हावे चिंब
विस्कटू नये
सोन्याची सुरी पोटात
खुपसून घेऊ नयेश्वास हा उच्छ्वास होणे
अटळ आहे
हाच क्षण राजगृह
उभारण्याचा आहे
View comments
Loading
- मृगजळात पोहायालामृगजळात पोहायाला
शोधावा उन्हाचा काठ
सूर खोल माराया
अनित्यतेचा घाटपरतीच्या स्वप्नामधली
स्वतः खुडावी प्रभा
तरंगणाऱ्या लाटेवरूनी
खुलवीत जावे नभादिक्क:लाच्या वसतीचा
लोपतो जन्म नि हर्ष
उन्मळू नये कदापि
जर झाला विहंग स्पर्श
View comments
Loading- पिढीजात वयराजधानी
नजरेच्या टप्प्यात आलेली असतांना
क्षणभंगूर अपयशाच्या कंबरेत घालावी लाथ
अर्धोन्मीलीत डोळे
उघडावेत पूर्णपणे
पाहावे,
ज्या खोप्यात लहानाचे मोठे झालो
त्याच्या काडीकाडीतली बारुद
फुंकरीने उडवू शकते
अभिजात रक्तलांछीत नखे धारण करणाऱ्या रंगलोलुप श्वापदांनासम्यक संबुद्धत्व प्राप्त करणारांना
जंगलाचे नसते भय
उथळ पाण्याला दाखवून दिलं पाहिजे
आपलं पिढीजात वय.
•संजय डोंगरे9420704580
View comments
Loading