🌻जोहार
"हर्षा, कशी आहेस?" असे विचारले
तेव्हा ती हसून म्हणाली ,"तुमच्या आशिर्वादाने चांगलं सुरू आहे ब्वॉ.मायबापाने जिथं दिलं तिथं राहणं भाग आहे." मनभरून हसत ती म्हणाली.
तेवढ्यात मला एक फोन आला.एका कार्यक्रमासाठी मला जायचं होतं.तो कार्यक्रम माझ्या शिवाय सुरू होणार नव्हता.मी कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो.वेळेचे बंधन कडक होते. उशिरा जर कार्यक्रम सुरू झाला तर उशिरा बंद करावा, असे नव्हते. कधीही सुरु झाला तरी कार्यक्रम थांबविण्याची वेळ निश्चित होती. तो शासकीय नियमाचा भाग असल्याने पाळणे अत्यावश्यक होते.
हर्षासोबत आयाबायांचा घोळका आला होता.सर्वजणी आपापल्या परीने निटनेटके होऊन आल्या होत्या.माझ्या बाजूच्या घरात माझे शेजारी राहत होते.ते कोर्टाचे कर्मचारी असल्याने आणि आमचे वार्तालाप त्यांच्या संहितेत बसत नसल्याने आमच्याकडे त्यांचे लक्ष असण्याचे काही कारण नव्हते. ते त्यांच्या कामात गर्क असतात. माझ्या पुस्तकाच्या कपाटाकडे पाहत हर्षा म्हणाली,"या कपाटातला सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह मी वाचायला नेला होता." त्यावर मी काही बोलणार तोच फोन पुन्हा वाजला. मी हॅलो म्हणताच तिकडून आवाज आला. सर, प्लीज लवकर या." मी म्हणालो, "हो." मी घाई करू लागलो.महिला क्रिकेटचं उद्घाटन करायला जायचं होतं.
हर्षा सकाळी दक्षिणेकडे कापशीला एक तास घ्यायला जायची मग घरी अकोला येथे यायची. दुपारी पश्चिमेला पारसला आणखी एक तास घ्यायला जायची. मी तिला हे काही विचारलं नव्हतं पण असंच एकदा बोलता बोलता तिने सांगितले होते. जिथपर्यंत बस जाते तिथपर्यंत बसने जायचं. तिथे उतरून तिथे ठेवलेली गाडी घ्यायची. तिथून गाडीने जायचे. गाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ठेवलेली असे. तिथले कर्मचारी कोविडच्या महामारीतून वाचलेले होते. आता सटरफटर आजारांचे पेशंट यायला सुरुवात झाली होती. त्यांना उसंत नव्हती. ते आपल्या कामात मग्न असायचे.
मी पलंगावर जिथे बसलो होतो तिथल्या तिथे चुळबुळ करू लागलो.हर्षा खाली बसून चटई वरून बोटे फिरवू लागली.तिच्या हातात एकही बांगडी नव्हती.डाव्या हातात घड्याळ होते.साडी बऱ्यापैकी होती.गळ्यात सोन्याची चेन आणि बोटात अंगठी होती.
तिने एकदा कबड्डी खेळताना सगळ्या टीमला जास्तीत जास्त पॉईंट घेऊन जिंकून दिले होते. तेव्हा ही ती माझ्याकडे आली होती.तिचं अभिनंदन माझ्याकडून करवून घ्यायला.आम्हीही एक छोटेखानी कार्यक्रम करून तीचा सत्कार केला होता. "आता तू खेळणं सोडलं का?" असं मी तिला विचारताच ती म्हणाली,"मी आता कोच आहे."
तीने एका मध्यम वयीन महिलेच्या हातातील फळांची पिशवी घेऊन त्यातील फळे माझ्यासमोर टीपॉय वर असलेल्या बांबूच्या टोपलीत रचून ठेऊ लागली.तेव्हा तिच्या टिकली नसलेल्या गोऱ्या कपाळावर केसांची एक बट उगाच लोंबकळू लागली. फळे ठेवून झाल्यावर डाव्या हाताने तीने कपाटाखालचे जुने वर्तमान पत्र ओढून त्यात काहीतरी पाहू लागली. तिने यु ट्यूब वर बणवलेले काही व्हिडिओ मला दाखवले.त्यात तिने समोरचे कापलेले केस विशेषत्वाने दिसत होते. एकदा एका कार्यक्रमासाठी आम्ही सगळे ओक हाॅल मध्ये एकत्र आलो होतो.त्यावेळी तिने गझल गायली होती. माझ्या ती स्मरणात राहीली. मग दुसऱ्या वेळी एका हाॅस्पीटल मध्ये ती मला दिसली तेव्हा मी तिला स्वतःहून विचारलं की ,"तू इथे कशी? "तेव्हा तिने तिचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाल्याचे सांगितले. तेव्हापासून आमचा स्नेह कायम आहे.
हर्षाचा सावळा रंग आता सावळा न राहता तो निमगोरा होत आहे असे तिने एकदा मला सांगितले तेव्हा मी तिला विचारले होते की त्यासाठी तू कोणते क्रीम लावले. तेव्हा तिने मला अनेक क्रीम्स आणि तेलांची नावे सांगीतले. ज्याचा मला काहीही उपयोग नव्हता.तीच्या आत्याने तिची एक किडनी तीच्या काकांना देऊन त्यांचे प्राण वाचवले होते. त्याच तिच्या आत्याने तीला हा उपाय सांगीतला होता.
हर्षाचे एक आजोबा होते. त्यांना चार बायका होत्या. त्या आपापल्या लेकरांसोबत राहायच्या. रिटायर झाल्यावर ते एका बायको सोबत राहू लागले. तेव्हा एकीने खावटी वेळेवर मिळाली नाही म्हणून पोलीस पाठवले होते. तेव्हा पासून त्यांनी मुलीला बोलावून घेतले आणि त्यांची मुलगी तिथेच राहू लागली. आता कुणाचीही भांडणे होत नसत. हर्षा नळावर पाणी भरायला जाई तेव्हा आजोबा आपल्या नातीला कडेवर घेवून अंगणातल्या खाटेवर एक टांगी धोतर चापून चोपून नेसून बसलेले असत.हर्षाने तेव्हाच ठरवलं की आपण लग्न करायचं नाही. पण तिचा हा संकल्प तिला कालांतराने मोडावा लागला. तो मोडला म्हणून बरे झाले नाहीतर ती एका निष्णात बुद्धिबळ पटुची आई कशी काय झाली असती.
हर्षा आत गेली आणि चहाचे कप घेवून आली. उजव्या हातात ट्रे धरून डाव्या हाताने ती सर्वांना कप वाटू लागली.अंगणातल्या चाफ्याच्या झाडाला पांढरी शुभ्र फुले आली होती.
हर्षाची चुलत बहीण डॉक्टर आहे. ती सध्या अमेरिकेत राहते. तिने तिचे पहिले मिस्टर जे इंजिनियर होते त्यांना सोडचिठ्ठी दिली होती. करारा नुसार मुलगी सोबत घेवून तिने सध्याचे तिचे मिस्टर जे इंजिनियर तर आहेतच पण अमेरिकेत स्थायिक झाले आहेत आहेत त्यांच्याशी विवाह केला. पण अजूनही ती हर्षाला विसरली नाही.अधून मधून फोन करत राहते. ती अमेरिकेत असली तरी तिच्या संसारात खूष आहे ना बस आपल्याले दुसर काय पायजे असे तिचे बाबा कुणी विचारलं तर सांगत.मात्र ती लग्न झाल्यापासून कधीही भारतात आली की पहिल्यांदा सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी बोलवते.असे चहाचे कप नेता नेता तिने मला सांगितले.
मी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहू लागलो. त्याच्या बाजूलाच संविधानाची प्रत ठेवली होती.
सगळ्या आयाबाया संविधानाच्या प्रतीला नमस्कार करू लागल्या. आमचं घर पूर्णपणे जागृत झालं होतं.
🔅 संजय प्रल्हादराव डोंगरे°
९४२०७०४५८०
6_Mar_page final.pdf
बहुजन सौरभ ५ मार्च २३.pdf

No comments:
Post a Comment