अरिय परिवाराचे केरुबुवा गायकवाडांना अभिवादन व पुस्तक प्रकाशन संपन्नदि.२४ मे २०१९ मे रोजी समता कॉलनी बुद्धविहार येथे अरिय परिवाराचे केरुबुवा गायकवाड यांना अभिवादन व डॉ अशोक इंगळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले अध्यक्ष स्थानी ना.मु.कांबळे तर प्रमुख अतिथी लोकशाहीर वसंतदादा मानवटकर, कवी भगवंत तायडे, मेजर आर. सी. भगत ,डॉ.भास्कर पाटील आणि अरिय चे संपादक संजय डोंगरे होते.
प्रारंभी तथागत बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,आणि केरुबुवा गायकवाड यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
पाहुण्यांच्या स्वागतानंतर वसंतदादा मानवटकर यांनी केरुबुवांच्या पदांचे गायन व आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी केरुबुवा यांचे नातू राजेंद्र गायकवाड यांनी आपल्या आठवणी सांगून इतिहासाला उजाळा दिला. संबंध कार्यक्रमाचे संचालन करीत असताना डॉ. अशोक इंगळे यांनी केरुबुवा गायकवाड यांची माहिती सांगितली.
दुसऱ्या टप्प्यात डॉ. अशोक इंगळे यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांसमोर दिलेली भाषणे या ग्रंथाचे प्रकाशन अध्यक्ष ना.मु.कांबळे आणि मान्यवर यांचे हस्ते संपन्न झाले याच प्रसंगी डॉ. संजय पोहरे यांच्या नवे गावकुस या एकांकिका संग्रहाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी बुद्धविहारास पुढील प्रमाणे पुस्तकांचे दान देऊन उपस्थितांनी आपल्या कविता सादर केल्या °संजय डोंगरे •अरिय वार्षिकांक 2016 पाच प्रति •अरिय वार्षिकांक2015 एक प्रत •अरिय वार्षिकांक2014 एक प्रत•धम्मसंगिती एक प्रत•धम्मवाक्य एक प्रत °मोहन शिरसाट -नाही फिरलो माघारी °सचिनकुमार तायडे -आसवांची शाई °अमोल बी शिरसाट-जातींचे निर्मूलन °प्रा. डॉ. भास्कर पाटील-•गौतम बुद्धाचे चरित्र•विश्व विजयी तिरंगा प्यारा•गोष्ट गोधराजाची•त्यांचं धोरण यांच मरण दोन प्रति °डॉ. अशोक इंगळे-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर दिलेली भाषणे °शाहीर वसंत मानवटकर-•बोधिवृक्षाखालील काव्यफुलें•स्वागतगीते ° प्रा. संजय पोहरे-•आकांक्षा•नवे गावकुस °पंजाबराव वर-•भ्रूणकन्येचा टाहो •वऱ्हाडी झटका °शेषरावजी मनवर-मुलांसाठी बुद्धधम्म °प्रा. दिवाकर सदांशीव-राजर्षि शाहू विचार व कार्य ° विशाल नंदागवळी-मॅरेथॉन °भगवंत तायडे -•शिवलेले ओठ •लढे अंधश्रद्धेचे °नामदेवराव झोपुजी तायडे-बुद्ध आणि त्यांचा धम्म ° ना. मु. कांबळे-सुबोध धम्म प्रश्नोत्तरी ° राहुलबंधु गोपणारायन ° अनंत वानखडे °प्रजानंद उपर्वट ° देवानंद जवंजाळ °विनोद किरतकार °शीलवंत डोंगरे ° गजानन डोंगरे °विष्णू निंबाळकर °मेजर खडसे °वानखडे साहेब °कांबळे साहेब °अभिजित कांबळे यांनी इंग्रजी कविता सादर केली.
कार्यक्रमाला समता कॉलनी दीक्षा कॉलनी वॉर्ड न 15 मधील नागरिक आणि अकोला शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून कवी रसिकांनी उपस्थित राहून प्रबोधनाचा आनंद घेतला.या प्रसंगी आयोजकांतर्फे उपस्थितांना शीतपेयाचे वाटप करण्यात आले.कविसंमेलनाचे संचालन गझलकार अमोल शिरसाट आणि या संबंध कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. संजय पोहरे यांनी केले.
●






No comments:
Post a Comment